कोरोनासंदर्भात मोठी अपडेट! ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ रुग्णांचा मृत्यू; कोणत्या राज्यात किती बाधित? (फोटो सौजन्य-X)
Corona Virus Update In Marathi: देशात कोरोनाचे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या ५ दिवसांत कोविडचे १७०० रुग्ण आढळले आहेत आणि आता ही संख्या २७०० च्या पुढे गेली आहे. याचप्रकरणी आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयांनी सांगितले की, ३० मे पर्यंत देशभरात २७१० रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी एका आठवड्यात ७५२ रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णांची संख्या सातत्याने वेगाने वाढत आहे.
देशातील वेगवेगळ्या राज्यांबद्दल बोलयाचे झाले तर आंध्र प्रदेशात १६, अरुणाचल प्रदेशात ३, आसाममध्ये २, चंदीगडमध्ये १, छत्तीसगडमध्ये ३, दिल्लीत २९४, गोव्यात ७, गुजरातमध्ये २२३, हरियाणामध्ये २०, जम्मू आणि काश्मीरमध्ये ४, कर्नाटकात १४८, केरळमध्ये ११४७, मध्य प्रदेशात १०, महाराष्ट्रात ४२४, मिझोराममध्ये २, ओडिशामध्ये ५, पुद्दुचेरीमध्ये ३५, पंजाबमध्ये ४, राजस्थानमध्ये ५१, तामिळनाडूमध्ये १४८, तेलंगणात ३, उत्तराखंडमध्ये २, उत्तर प्रदेशात ४२ आणि पश्चिम बंगालमध्ये ११६ रुग्ण आढळले आहेत. दिल्लीतही एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
केरळ (+३५५), महाराष्ट्र (+१५३) आणि दिल्ली (+२४) यासह अनेक राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. याशिवाय महाराष्ट्र (+४) आणि कर्नाटक (+१) यासह काही ठिकाणी मृत्यूही वाढले आहेत. तथापि, अनेक राज्यांमध्ये कोणतेही नवीन रुग्ण किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही. याशिवाय, कोविड-१९ मधून बरे झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. कोरोनाला हरवणाऱ्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक ८,२९,८४९ आहे, केरळमध्ये ६,८४,९२७ आणि आंध्र प्रदेशात २,३२,६३५ आहे.
महाराष्ट्र (१,४८,६०६), तामिळनाडू (३८,०८६) आणि कर्नाटक (४०,४१२). १९ मे नंतर देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणूचे नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश (४), छत्तीसगड (१), गोवा (१), गुजरात (७६), हरियाणा (८), कर्नाटक (३४), मध्य प्रदेश (२), राजस्थान (११), तामिळनाडू (३) आणि तेलंगणा (१) यांचा समावेश आहे.