कतारमधील न्यायालयाने गुरुवारी (२६ ऑक्टोबर) हेरगिरी प्रकरणात नौदलाच्या ८ माजी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली. याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो असून आम्ही सविस्तर निर्णयाच्या प्रतीची वाट पाहत आहोत. (Ex Navy Officers Gets death penalty in Qatar)
मंत्रालयाने सांगितले की, “आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत आणि सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत. आम्ही ही बाब अत्यंत महत्त्वाची मानतो आणि त्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत. सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर सहाय्य प्रदान करणे सुरू ठेवेल. कतारी अधिकार्यांकडेही हा निर्णय मांडणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून सांगितले की, हे आठ जण कतारस्थित अल दाहरा कंपनीत काम करतात. वास्तविक, हे आठ भारतीय गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२ पासून कतारमध्ये तुरुंगात आहेत.
काय आहे आरोप?
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कतारने नौदलाच्या माजी कर्मचाऱ्यांवर पाणबुडीच्या कार्यक्रमात हेरगिरी केल्याचा आरोप केला आहे. कॉन्सुलर ऍक्सेसद्वारे त्यांची सुटका करण्याचा भारताचा प्रयत्न होता.