बकरी ईद कशी साजरी करायची? सरकारची नवी गाइडलाइन जारी; नियम मोडल्यास थेट जेलची कारवाई
Delhi Bakrid Guidelines News Marathi : भारतात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या धर्माचे सण साजरे केले जातात. त्यातील एक मुस्लिम बांधवांचा सण म्हणजे बकरी ईद. इस्लमिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते.याचपार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने बकरी ईदसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. दिल्लीत रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये जनावरांचा बळी देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. बळी केवळ अधिकृत ठिकाणीच देता येईल. दिल्ली सरकारचे मंत्री कपिल मिश्रा यांनी बकरीदसाठीच्या दिल्ली सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे, “बकीद ईदच्या दिवशी गुरे, गायी, वासरे, उंट आणि इतर निषिद्ध प्राण्यांचा बळी देणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. असे करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये जनावरांचा बळी देण्यास परवानगी नाही; असे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. बळी दिल्यानंतर गटार, नाले किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे. बळी केवळ अधिकृत ठिकाणीच देता येईल. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यास पोलिसांना आणि दिल्ली सरकारच्या विकास मंत्रालयाला कळवता येईल.”
Rajya Sabha election 2026 : निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकांची घोषणा; १८ जून रोजी मतदान
यापूर्वी, मंत्री कपिल मिश्रा यांनी गुरुवारी विकास विभागासोबत झालेल्या बैठकीत, जनावरांची अवैध वाहतूक, अवैध बळी आणि जनावरांवरील क्रूरतेच्या प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मंत्री म्हणाले की, बकरीदच्या काळात केवळ अधिकृत आणि निश्चित ठिकाणीच बळी देण्यास परवानगी दिली जाईल. गाय, वासरू, उंट आणि इतर निषिद्ध जनावरांची कत्तल किंवा बळी देण्यास सक्त मनाई असेल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल. रस्ते, गल्ल्या किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बळी देण्यास परवानगी दिली जाणार नाही, याची खात्री करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी जनावरांची खरेदी-विक्री करणे देखील बेकायदेशीर आहे. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई करावी.
मंत्री म्हणाले की, बळी दिल्यानंतर जनावरांचे अवशेष उघड्यावर फेकू नयेत आणि रक्त रस्त्यावर किंवा गटारात वाहू देऊ नये. संबंधित विभागांनी संयुक्तपणे यावर लक्ष ठेवावे. मंत्र्यांनी सांगितले की, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत अशी प्रकरणे शिक्षापात्र गुन्हे आहेत. बेकायदेशीर कत्तलखाने, प्राण्यांची बेकायदेशीर वाहतूक किंवा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत.
मंत्र्यांनी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि संबंधित विभागांना संवेदनशील भागांमध्ये विशेष दक्षता ठेवण्याचे निर्देश दिले. त्यांनी जनतेला आवाहन केले की, जर त्यांना बेकायदेशीर बळी किंवा प्राण्यांवरील क्रूरतेबद्दल माहिती मिळाली, तर त्यांनी तात्काळ प्रशासनाला कळवावे.
जरा जपूनच ! देशात एलपीजीचा तुटवडा कायम; टंचाई आता आणखी वाढणार, घरगुती उत्पादन मागणी…






