'या' ३ कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा, अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश (फोटो सौजन्य-X)
Ahmedabad Plane Crash News in Marathi : गुजरातमधील अहमदाबाद येथील विमानतळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मेघानी येथे एअर इंडियाचं बोईंग 787 हे विमान पडलं.या अपघातामध्ये २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर भारताच्या नागरी विमान वाहतूक नियामक संस्थेने डीजीसीएने एअर इंडियाला अलिकडेच झालेल्या अहमदाबाद विमान अपघातात गंभीर सुरक्षा उल्लंघन आढळल्यामुळे तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्यास सांगितले आहे. हा आदेश १२ जून रोजी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर कोसळल्यानंतर काही दिवसांतच आला आहे, ज्यामध्ये २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान टेकऑफनंतर लगेचच बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीशी धडकले. या अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. फक्त एकच व्यक्ती वाचली. याशिवाय, जमिनीवर किमान २९ जणांचा मृत्यू झाला. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए मॅचिंग सुरू आहे. आतापर्यंत २२० नमुन्यांपैकी २०२ मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यात १६० भारतीय, ७ पोर्तुगीज, ३४ ब्रिटिश आणि १ कॅनेडियनचा समावेश आहे. या अपघातानंतर केलेल्या सखोल चौकशीदरम्यान, डीजीसीएने एअर इंडियाच्या तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. सुरक्षा उल्लंघनाचे गांभीर्य लक्षात घेऊन, डीजीसीएने एअर इंडियाला दोषी कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे निर्देश दिले आहेत. याचदरम्यान ड्रीमलाइनर आणि एअरबस विमानांची विशेष तपासणी वेगाने केली जात आहे. तपास सुरू आहे. तसेच, ब्लॅक बॉक्सची प्राथमिक माहिती गोळा केली जात आहे. इंजिन, स्लाइड, फ्लॅप किंवा टेकऑफशी संबंधित कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा.
अहमदाबादमधील हा विमान अपघात मेघनी नगर परिसरात झाला. विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले. अनेक मृतदेह गंभीरपणे जळाले होते आणि त्यांची ओळख पटू शकली नव्हती, त्यामुळे अपघातानंतर मृतांची डीएनए चाचणी देखील घेण्यात आली. विमानात असलेल्या २४२ प्रवाशांपैकी फक्त एकच जण वाचला.
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की उड्डाणानंतर काही सेकंदातच विमानाच्या मुख्य विद्युत यंत्रणेत वीज खंडित झाली. घटनास्थळावरून मिळालेले सर्व पुरावे, विमानाचा ढिगारा आणि टेक-ऑफ अपघाताचा व्हिडिओ पाहता विजेमध्ये काही समस्या असल्याचे स्पष्ट होते आणि ब्लॅक बॉक्सचा डेटा मिळाल्यानंतर याचे कारण कळेल.
अधिकाऱ्याने सांगितले की ब्लॅक बॉक्स आणि डीव्हीआर सापडले आहेत, परंतु या उपकरणांचे खूप नुकसान झाले आहे आणि त्यातून डेटा काढणे खूप कठीण होईल. ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवण्याबाबतही चर्चा सुरू आहे. त्यांनी सांगितले की ड्रीमलायनरच्या अवशेषांमुळे कॉकपिटमध्ये कोणताही गोंधळ झाल्याचे दिसून आले नाही आणि वैमानिकाने विमान मागे वळवून मॅन्युअल नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला असावा.