पूंछ हल्ल्यातील पिडीतांना राहूल गांधींचा दिलासा
Rahul Gandhi Poonch Visit: जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. या घटनेनंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज शनिवारी (२४ मे) पूंछला भेट दिली. जम्मू आणि काश्मीर काँग्रेसचे प्रभारी सय्यद नसीर हुसेन आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तारिक हमीद करा यांनी या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली.
नसीर हुसेन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, “पाकिस्तानने नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले, अनेक जण जखमी झाले. जम्मू-कश्मीरात राहुल गांधींनी लवकर येथे पोहोचावे अशी आमची इच्छा होती, परंतु काही कारणामुळे हा दौरा ठरत नव्हता. पण आज ते जम्मू-कश्मीर दौऱ्यावर आले आणि पिडीतांची भेट घेतली.
तर तारिक मेहता म्हणाले की, ‘राहुल यांच्या भेटीमुळे स्थानिक लोकांना मानसिक बळ मिळणार आहे. विशेष म्हणजे राहुल गांधींचा दौरा महत्त्वाचा आहे. पुंछमध्ये झालेल्या हल्ल्याने सर्वाधिक नुकसान पुंछ भागात झाले आहे. राहुल गांधी आज या हिंसाचारामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या लोकांना भेटण्यासाठी आले आहेत. ते गोळीबारात नुकसान झालेल्या संस्थांनाही भेट देतील. यासोबतच, ते या घटनेत ज्या कुटुंबांनी आपली मुले गमावली आहेत त्यांनाही भेट देतील. हा दौरा स्थानिक लोकांना मानसिक आणि सामाजिक बळ देईल.”
पूंछ दौऱ्यादरम्यान, राहुल गांधी यांनी सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या शाळेलाही भेट दिली. तिथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि परिस्थिती पुन्हा सामान्य होईल, असे आश्वासन दिले. तसेच, तुम्ही धोकादायक आणि थोडी भीतीदायक परिस्थिती पाहिली आहे, पण काळजी करू नका, सर्वकाही सामान्य होईल. या समस्येला तोंड देण्याचा मार्ग म्हणजे कठोर अभ्यास करणे, भरपूर खेळणे आणि भरपूर मित्र बनवणे. शिक्षण आणि एकता हेच या संकटाचे उत्तर आहे.” असंही राहुल गांधींनी नमुद केलं.
पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित झालेल्या कुटुंबांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, “ही एक मोठी शोकांतिका आहे. अनेक लोकांनी आपले प्राण गमावले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मी पीडित कुटुंबांशी बोललो, त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काही मुद्दे मांडण्याची गरज व्यक्त केली असून मी ते नक्कीच संसदेत उपस्थित करेन.” राहुल गांधींनी त्यांच्या या दौऱ्याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानकडून सीमेपलीकडून गोळीबार सुरु झाला. २२ एप्रिल रोजी दुपारी पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता, तर १० हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने ६ ते ७ मे २०२५ च्या रात्री कारवाई करत पाकिस्तान आणि पीओकेमधील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या तळांवर हवाई हल्ले केले. या कारवाईत १०० दहशतवादी मारले गेले. हवाई कारवाईनंतर पाकिस्तानकडून पुन्हा सीमेपलीकडून गोळीबार, क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
आज पुंछ में पाकिस्तान की गोलाबारी में जान गंवाने वाले लोगों के परिवारों से मिला।
टूटे मकान, बिखरा सामान, नम आंखें और हर कोने में अपनों को खोने की दर्द भरी दास्तान – ये देशभक्त परिवार हर बार जंग का सबसे बड़ा बोझ साहस और गरिमा के साथ उठाते हैं। उनके हौसले को सलाम है।
पीड़ित… pic.twitter.com/CIDEXmqXxG
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 24, 2025