अमित शहा यांनी बोलावली महत्वाची बैठक (फोटो- सोशल मिडिया)
सीजेपीचे आंदोलन भरकटले असल्याचे देखील म्हटले जात आहे. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी सौम्य लाठीचार्ज तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता आंदोलक संसद भवनाच्या अगदी जवळ येऊन ठेपल्याने सरकारने हालचाली वाढवल्या आहेत.
सीजेपीचे आंदोलन संसद भवन परिसरात सुरू आहे. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सतर्क झाले आहेत. दिल्लीत वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकारने देखील आता काही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयात एक महत्वाची बैठक सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्लीतील अमित शहा यांच्या कार्यालयात महटवची बैठक सुरू झाली आहे. अमित शहांच्या दालनात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला बैठकीत धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल, किरन रीजीजू उपस्थित असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे लवकरच या आंदोलनावर काही तोडगा निघणार का हे पहावे लागणार आहे.
तर दुसरीकडे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस आयुक्त, गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख आणि आयबीचे प्रमुख यांच्यात देखील महत्वाची बैठक सुरू असल्याचे समोर येत आहे. आंदोलनाच्या वेळेस काहीसा तणाव देखील पाहायला मिळाला. इतके दिवस केंद्र सरकारने काहीच पावले उचलली नसल्याचे दिसून आले.
आंदोलन सकाळी सुरू झाल्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील अमित शहा यांची भेट घेतली होती. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला सरकारनने कोणताही प्रतिसाद दिला नाही, संवाद साधण्याचा प्रयत्न केला नसल्याची टीका केली जात आहे.






