नवी दिल्ली – राजस्थान आणि महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये नुपूर शर्मांच्या समर्थकावर हल्ला झाला आहे. नुपूर शर्मांचा व्हिडिओ पाहिल्याने सीतामढी येथील अंकित झा यांना चाकूने भोसकण्यात आले. भर बाजारात अंकितवर चाकूने 6 वार करण्यात आले. अंकितची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर दरभंगा येथील डीएमसीएचच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. अंकितचा चाकू मारल्यानंतरचा व्हिडिओही समोर आला आहे.
अंकितने सांगितले की, तो त्याच्या मित्रासोबत दुकानात बसून मोबाईलमध्ये स्टेटस पाहत होता. त्यात नुपूर शर्माचा एक व्हिडिओ होता. मागून काही लोक आले आणि त्यांनी विचारले नुपूर शर्माचा समर्थक आहेस का? मी हो म्हणताच चाकू मारायला सुरुवात केली.
अंकित पान खाण्यासाठी एका पान दुकानात गेला होता. यादरम्यान तो नुपूर शर्माचा व्हिडिओ मोबाईलमध्ये पाहत होता. त्याचवेळी मोहम्मद बिलालसह 3 लोक दुकानात आले आणि मोबाईलवर नुपूर शर्माचा व्हिडिओ पाहून संतापले. या तिघांनी प्रथम सिगारेटचा धूर अंकितच्या चेहऱ्यावर उडवला. त्यानंतर शिवीगाळ सुरू केली. विरोध केल्याने तिघांनी अंकितच्या उजव्या बाजूला कंबरेजवळ चाकूने वार केले. अंकित झा हा नानपूरच्या बहेरा गावचा रहिवासी आहे.