कुणाल कामराचे निवडणूक आयोगाविरुद्ध ट्विट (फोटो -ani)
LiveUnstoppable/Rahul Gandhi: अनेक दिवसांपासून राहुल गांधी हे महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावरून निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी झाली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले.दरम्यान आज महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जनआक्रोश आंदोलन केले. याच दरम्यान कुणाल कामराने एक ट्विट करत निवडणूक आयोगालाच लक्ष्य केले आहे. त्याने ट्विट करत निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे कुणाल कामरा हा चांगलाच चर्चेत आला होता. विनोदी कलाकार कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर विंडबनात्मक गाणे गायले होते. त्यावरून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा कुणाल कामरा चर्चेत आला आहे. त्याने ४ शब्दाचे ट्विट करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
विनोदी कलाकार कुणाल कामराने याआधी देखील निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. ७ ऑगस्ट रोजी त्याने निवडणूक आयोगावर ‘द सिलेक्शन कमिशन ऑफ इंडिया’ म्हणत टीका केली होती.
*The Selection Commission Of India*
— Kunal Kamra (@kunalkamra88) August 7, 2025
आता पुन्हा एकदा विरोधी पक्ष निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करत आहेत. मतांची चोरी झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा कुणाल कामराने निवडणूक आयोगाला डिवचले आहे. त्याने ‘द कॉम्प्रोमाइज ऑफ इंडिया’ असे ट्विट करत निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
*Election Compromise of India*
— Kunal Kamra (@kunalkamra88) August 11, 2025
या ट्विटमुळे कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. त्याच्या पोस्टमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
LiveUnstoppable: निवडणूक आयोगाकडून संदेश..; चर्चेसाठी ३० जणांना आमंत्रण, कोण कोण जाणार?
निवडणूक आयोगाकडून संदेश..; चर्चेसाठी ३० जणांना आमंत्रण
निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या ३० सदस्यांच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावले होते. त्यानंतर आयोगाने निवडणूक आयोगाने दुपारी १२ वाजता ३० लोकांना भेटण्यासाठी बोलावले. भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र लिहून दुपारी १२:०० वाजता चर्चेसाठी वेळ दिला होता. जागेअभावी, जास्तीत जास्त ३० जणांची नावे कळवावीत अशी विनंती केली होती. पण एकतर सर्वजण निवडणूक आयोगाकडे जातील किंवा कोणीही जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.
मतदार यादीतील अनियमिततेवरून लढाई सुरूच आहे. राहुल गांधींसह सर्व विरोधी नेते निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल यांनी निवडणूक आयोगावर थेट मत चोरीचा आरोप केला आहे. त्यांनी काल यासंदर्भात एक मोहीम देखील सुरू केली आहे. याअंतर्गत राहुल यांनी एक वेबसाइट देखील सुरू केली आहे. यासोबतच त्यांनी लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहनही केले आहे.