नवी दिल्ली – सिंगापूरमधील एका रुग्णालयात सोमवारी राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांच्यावर किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. ही शस्त्रक्रिया तासभर चालली. लालूंना त्यांच्या कन्या रोहिणी आचार्या यांनी किडनी डोनेट केली आहे. लालूंपूर्वी रोहिणीचे ऑपरेशन करण्यात आले. सध्या दोघेही ICU मध्ये आहेत.
लालूंचे छोटे सुपुत्र तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात ते म्हणाले की, पप्पा शुद्धीत आहेत. बोलत आहेत. तुम्हा सर्वंच्या शुभेच्छांसाठी कोटी-कोटी आभार. मीसा भारतींनीही सोशल मीडियावर आपल्या वडिलांची प्रकृती चांगली असल्याचे म्हटले आहे.
ऑपरेशनपूर्वी रोहिणीने लालूंसोबतचे एक छायाचित्र ट्विट केले. त्यात त्या म्हणाल्या – रेडी टु रॉक एंड रोल. तुमचे कल्याण हेच माझे आयुष्य आहे. माझ्यासाठी एवढेच पुरेसे आहे. लालू व रोहिणी हे दोघेही सध्या रुग्णालयात दाखल आहेत. या दोघांचाही रक्तगट एबी पॉझिटीव्ह आहे. सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ रुग्णालयात प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया झाली.
किडनी ट्रांसप्लांटपूर्वी लालूंच्या कन्या रोहिणीने ट्विटरवर रुग्णालयातील फोटो शेयर करत म्हटले आहे की, रेडी टू रॉक अँड रोल…दुसऱ्या ट्विटमध्ये रोहिणींनी लालूंची प्रकृतीच आपल्यासाठी सर्वकाही असल्याचे म्हटले आहे.