Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन

Marathi Breaking Live Updates : राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्व, देश-विदेशसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 18, 2025 | 07:00 PM
LIVE
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय;

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय;

Follow Us
Close
Follow Us:
  • 18 Dec 2025 07:00 PM (IST)

    18 Dec 2025 07:00 PM (IST)

    सिमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या धुरा आता तरुण पिढीच्या हाती!

    भारतातील सिमेंट उत्पादकांची सर्वोच्च संघटना असलेल्या सिमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (Cement Manufacturers Association) (CMA) १८ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जेएसडब्ल्यू सिमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पार्थ जिंदाल यांची सीएमएच्या नव्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जे. के. सिमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राघवपत सिंघानिया यांनी असोसिएशनचे उपाध्यक्षपद स्वीकारले आहे. नवनियुक्त अध्यक्ष श्री. पार्थ जिंदाल यांनी श्री सिमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. नीरज अखौरी यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. सीएमएच्या सदस्यांनी नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांना एकमताने मान्यता देत, संघटनेच्या नेतृत्वावर आपला ठाम विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. सीएमएच्या इतिहासात प्रथमच, असोसिएशनचे नेतृत्व तरुण पिढीतील अध्यक्ष आणि उपाध्यक्षांकडे आले असून, त्यांचा गतिमान दृष्टिकोन व दूरदृष्टी असलेले विचार सीएमएची ताकद आणि शाश्वत विकासाचा अजेंडा अधिक बळकट करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

    वाचा सविस्तर 

  • 18 Dec 2025 06:50 PM (IST)

    18 Dec 2025 06:50 PM (IST)

    Mumbai Local Train : आता लोकलचा प्रवास होणार आरमदायी!

    Mumbai Local Train News Marathi : मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर असून आता लोकलचा प्रवास आता आरामदायी होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारकडून लोकल निर्मितीसाठी महत्त्वाचा विचार करण्यात आला आहे. लोकल ट्रेन सेवेचे आधुनिकीकरण आणि ती अधिक सुरक्षित करण्यासाठी मोठी पावले उचलली जात आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, उपनगरीय रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढविण्याबरोबरच, प्रवाशांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. नवीन तंत्रज्ञान, स्वयंचलित दरवाजे प्रणाली आणि सुधारित कनेक्टिव्हिटी लवकरच मुंबई लोकल ट्रेन प्रवासात बदल घडवून आणतील.

    वाचा सविस्तर 

  • 18 Dec 2025 06:40 PM (IST)

    18 Dec 2025 06:40 PM (IST)

    IND vs SA 4th T20I : अखेर लखनौ टी-20 सामान्याबद्दल BCCI ने केली चूक मान्य!

    IND vs SA 4th T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी लखनौ येथे चौथा टी२० सामना खेळला जाणार होता. परंतु, धुक्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. यामुळे अटल बिहारी स्टेडियमवर जमलेले हजारो चाहत्यांच्या हात निराशा आली. या प्रकरणावर आता  बीसीसीआयने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयने अप्रत्यक्षपणे आपली चूक मान्य केल्याचे दिसत आहे. माध्यमांशी बोलताना, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, भविष्यात ते उत्तर भारतातील हवामान लक्षात घेऊन स्पर्धा आणि मालिका सामने वेळापत्रकबद्ध करण्याचा विचार करणार आहेत. सामना रद्द झाल्यामुळे चाहते खूप नाराज होऊन त्यांनी बीसीसीआयवर टीका देखील केली होती.

    वाचा सविस्तर

  • 18 Dec 2025 06:20 PM (IST)

    18 Dec 2025 06:20 PM (IST)

    वसईमध्ये शिवसेना-भाजपा युती

    वसई (वा.) : वसई-विरार महापालिकेसाठी बुधवारी भाजपा आणि शिंदे गटाकडून महायुतीची घोषणा करण्यात आली. मात्र जागावाटपाबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. या बैठकीला अजित पवार गटाला मात्र सामील करून घेण्यात आले नाही. वसई-विरार महानगरपालिका निवडणूक जाहिर झाल्यानंतर राजकीय हालचालीना वेग आला आहे. बुधवारी वसईत महायुतीची घोषणा करण्यात आली. शिवसेनेचे संपर्क नेते रवींद्र फाटक, भाजप आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, शिवसेने नेते राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर, तालुका प्रमुख सुदेश चौधरी, यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.

    वाचा सविस्तर

  • 18 Dec 2025 06:15 PM (IST)

    18 Dec 2025 06:15 PM (IST)

    Ford’s EV Setback: ईव्ही बाजाराला धक्का!

    Ford’s EV Setback: दक्षिण कोरियाच्या जागतिक ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी फोर्डने ‘एलजी एनर्जी सोल्यूशन’ सोबतचा तब्बल ५८,७३० कोटी रुपयांचा इलेक्ट्रिक व्हेईकल बॅटरी पुरवठा करार रद्द केला. म्हणजेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमधील संभाव्य बदल आणि ईव्हीच्या घटत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर फोर्डने हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. फोर्ड मोटरने ‘एलजी एनर्जी सोल्युशन’ सोबतचा एक मोठा इलेक्ट्रिक वाहन बॅटरी पुरवठा करार रद्द असून हा ६.५० अब्ज डॉलर्सचा करार होता. काही ईव्ही मॉडेल्सचे उत्पादन थांबवण्याच्या फोर्डच्या निर्णयानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या वाहन उत्पादक कंपनीने धोरणात्मक बदल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीसाठी कमकुवत दृष्टिकोनाचे कारण दिले आहे.

    वाचा सविस्तर 

  • 18 Dec 2025 06:06 PM (IST)

    18 Dec 2025 06:06 PM (IST)

    न्यू यॉर्क सिटीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय! ‘Medical Assisted Suicide’ दिला हिरवा कंदील

    Medical Aid in Dying Act New York : अमेरिकेच्या न्यूयॉर्क (New York) राज्याने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एक महत्त्वपूर्ण कायदा मंजुर केला आहे. न्यूयॉर्कने रुग्णांसाठी Medical Aid in Dying चा निर्णय मंजुर केला आहे. गव्हर्नर कॅथी होसुल यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, लवकरच यावर अधिकृतपणे स्वाक्षरी केली जाईल. दीर्घ चर्चाा आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

    वाचा सविस्तर

  • 18 Dec 2025 05:31 PM (IST)

    18 Dec 2025 05:31 PM (IST)

    फोर्डने रद्द केला एलजीसोबतचा अब्जावधींचा करार

    दक्षिण कोरियाच्या जागतिक ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी फोर्डने ‘एलजी एनर्जी सोल्यूशन’ सोबतचा तब्बल ५८,७३० कोटी रुपयांचा इलेक्ट्रिक व्हेईकल बॅटरी पुरवठा करार रद्द केला. म्हणजेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमधील संभाव्य बदल आणि ईव्हीच्या घटत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर फोर्डने हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे.

  • 18 Dec 2025 05:10 PM (IST)

    18 Dec 2025 05:10 PM (IST)

    नोव्हेंबर २०२५ मध्ये गाठला प्रवाशांचा विक्रमी टप्पा

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (CSMIA)ने नोव्‍हेंबर २०२५ मध्‍ये उत्तम प्रवासी वाहतूक कामगिरीची नोंद केली, जेथे या महिन्‍यादरम्‍यान ४८.८८ लाखांहून अधिक प्रवाशी संख्या नोंदवली गेली. या उत्तम कामगिरीचे श्रेय सणासुदीचा काळ आणि हिवाळ्यामध्‍ये प्रवासासाठी वाढलेल्‍या मागणीला जाते, तसेच व्‍यापक देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय कनेक्‍टीव्‍हीटीचे पाठबळ देखील मिळाले.

  • 18 Dec 2025 04:50 PM (IST)

    18 Dec 2025 04:50 PM (IST)

    नढाळमध्ये 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

    शिक्षण विभाग पंचायत समिती खालापूर व खालापूर तालुका गणित, विज्ञान अध्यापक मंडळ व जेएम म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांचे हिमांशु दिलीप पाटील इंग्रजी माध्यम शाळा नढाळ चौक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.18 रोजी आयोजित ५३ वे तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले प्रसाद थोरवे यांच्याहस्ते करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले तंत्रज्ञान,विज्ञान, गणित अशा विषयांबरोबर देश, राज्य यांचा कारभार हाताळणारे प्रशासनातील शिक्षण शाळेतून दिले पाहिजे. अशा प्रदर्शनाने देशाचे भावी शास्त्रज्ञ तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

  • 18 Dec 2025 04:40 PM (IST)

    18 Dec 2025 04:40 PM (IST)

    अनधिकृत ऊस वाहतुकीविरोधात वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

    शेवगाव तालुक्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या ऊस वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, दिवसेंदिवस ही समस्या अधिक तीव्र होत चालली आहे. दर आठवड्याला किमान एक तरी अपघाती मृत्यू या बेकायदेशीर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केला आहे.या अनियंत्रित व अनधिकृत ऊस वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी गुरुवारी शेवगाव येथील आंबेडकर चौकात केलेल्या आंदोलनादरम्यान केली. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत परिवहन विभागाच्या निष्क्रियतेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.येणाऱ्या मंगळवारपर्यंत ऊस वाहतूक करणाऱ्या अनधिकृत वाहनांवर ठोस कारवाई झाली नाही, तर त्याच दिवशी शेवगाव येथील क्रांती चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही प्रा. चव्हाण यांनी दिला आहे.

  • 18 Dec 2025 04:35 PM (IST)

    18 Dec 2025 04:35 PM (IST)

    उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

    महापालिका निवडणुका जवळ येत असताना सोलापूर भाजपमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने हायकमांडसमोर मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ मधील भाजपचे जुन्या पिढीतील निष्ठावंत कार्यकर्ते बिपीन धुम्मा यांनी थेट जीवाशी संबंधीत इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • 18 Dec 2025 04:30 PM (IST)

    18 Dec 2025 04:30 PM (IST)

    कोल्हारे येथे विजय हजारे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस

    कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीचे सदस्य विजय रामचंद्र हजारे यांनी स्थनिक पातळीवर नेरळ विकास प्राधिकरण मधील अनधिकृत बांधकाम आणि ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार याविरुद्ध उपोषण सुरु केले आहे. दरम्यान या उपोषणाचा तिसरा दिवस सुरु झाला असून रायगड जिल्हा परिषदेकडून त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीमधील बांधकामे करताना नेरळ संकुल विकास प्राधिकरणाचे नॉर्म डावलून बांधकामे करण्यात आली आहेत. रस्त्याच्या कडेला नीट=यंत्रणा रेषा डावलून बांधकामे करण्यात आली आहेत. ती सर्व बांधकामे तोडण्यात यावी या मागणीसाठी तसेच कोल्हारे ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र,भोगवटा प्रमाणपत्र देताना अनागोंदी झाली असल्याचा आरोप करून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी विजय हजारे यांनी उपोषण सुरु केले आहे.या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय जनता पार्टी,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आरपीआय आठवले पक्षाने पाठिंबा दिला आहे.

  • 18 Dec 2025 04:25 PM (IST)

    18 Dec 2025 04:25 PM (IST)

    कर्जतच्या विज्ञान प्रदर्शनात आपत्कालीन यंत्रणेवर सूचना मांडणारे प्रकल्प...

    कर्जत तालुक्याचे 53वे विज्ञान प्रदर्शन नेरळ येथे सुरू आहे,या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या प्रतिकृती पाहण्यासाठी शाळांचे विद्यार्थी गर्दी करून आहेत.दरम्यान प्रामुख्याने सध्या निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थितीवर मात करणाऱ्या प्रतिकृती लक्ष वेधत असून त्या प्रतिकृती यांच्या माध्यमातून अनेक सूचना करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी या विषयावर आधारित 53वे कर्जत तालुका प्रदर्शन नेरळ येथील शार्विल स्कूल मध्ये भरले आहे.कर्जत पंचायत समिती शिक्षण विभाग तालुका विज्ञान आणि गणित मंडळ आणि शार्विल स्कूल ऑफ एक्सलँस यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रदर्शन भरले आहे.या प्रदर्शनात प्राथमिक,माध्यमिक या दोन गटात तब्बल 189 प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत.त्या प्रतिकृती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील विविध शाळांचे विद्यार्थी यांनी गर्दी केली आहे.विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यापासून तालुक्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळांचे विद्यार्थी यांनी प्रदर्शनाला भेटी देत आहेत.या प्रदर्शनाचा विषय लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकृती मांडल्या आहेत,त्यात प्रामुख्याने आत्मनिर्भर भारत हा विषय घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प हे सरकारला सूचना करणारे ठरू शकतात.

  • 18 Dec 2025 04:20 PM (IST)

    18 Dec 2025 04:20 PM (IST)

    कल्याण पूर्व येथील राई रेसिडेन्सीच्या परिसरात दुर्गंधीच साम्राज्य

    उघड्या नाल्यांमधून वाहणारे सांडपाणी, कचऱ्याचे ढिगारे आणि योग्य स्वच्छतेचा अभाव यामुळे संपूर्ण परिसरात असह्य वास पसरत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची भीतीही व्यक्त केली जात आहे.

  • 18 Dec 2025 04:15 PM (IST)

    18 Dec 2025 04:15 PM (IST)

    वसई पूर्वेतील राजप्रभा औद्योगिक परिसरात तरुणाची निर्घृण हत्या

    वसई पूर्वेतील गोराई पाडा, मुकुंद नगर येथील राजप्रभा औद्योगिक परिसरात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. २४–२५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने (कोयता) निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोराने तरुणाच्या चेहरा व खांद्यावर वारंवार घाव घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात दहशत व अफरातफरीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच वालिव पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यासह डीसीपी पोर्णिमा चौगुले शृंगी, एसीपी उमेश माने पाटील, फॉरेन्सिक पथक व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी पुरावे संकलनास सुरुवात केली आहे.

  • 18 Dec 2025 04:10 PM (IST)

    18 Dec 2025 04:10 PM (IST)

    पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज...

    पनवेल महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक राहील, तसेच मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असणार असल्याची माहिती आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली.

  • 18 Dec 2025 04:05 PM (IST)

    18 Dec 2025 04:05 PM (IST)

    डहाणू समुद्रकिनाऱ्यावर अस्वच्छता; पर्यटकांचा नाराजीचा सूर

    सध्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असली तरी डहाणू सारख्या समुद्रकिनाऱ्यावर तयार करण्यात आलेली स्वच्छतागृह बंद अवस्थेत असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय झाल्याचं दिसून येतं . डहाणू समुद्रकिनाऱ्यालगत अनेक पर्यटक सध्या हजेरी लावत असले तरी या पर्यटकांसाठी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली स्वच्छतागृह मागील अनेक काळापासून अपूर्ण आणि बंद अवस्थेत असल्याने येथे येणाऱ्या महिला पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गैसोय होते. दिवसेंदिवस डहाणू समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढत असली तरी देखील डहाणू नगरपरिषदे कडून स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

  • 18 Dec 2025 03:55 PM (IST)

    18 Dec 2025 03:55 PM (IST)

    महाबॅटरीसह OnePlus 15R आणि OnePlus Pad Go 2 भारतात लाँच

    OnePlus ने भारतात एकाच वेळी OnePlus 15R आणि OnePlus Pad Go 2 लाँच केले आहे. OnePlus 15R हा ब्रँडचा प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन आहे जो फ्लॅगशिपसारखा परफॉर्मन्स देतो. हा भारतातील पहिला फोन आहे ज्यामध्ये Qualcomm चा नवीनतम Snapdragon 8 Gen 5 चिपसेट आहे आणि त्यात मोठी 7,400mAh बॅटरी आहे. OnePlus नुसार, 15R हा ऑल-राउंडर मिड-रेंजर म्हणून स्थित आहे.

    नवीन OnePlus Pad Go 2 दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो आणि तो MediaTek Dimensity 7300-Ultra द्वारे समर्थित आहे. OnePlus Pad Go 2 मध्ये 5G कनेक्टिव्हिटी देखील आहे. यात 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसाठी सपोर्ट असलेले 12.1-इंच LCD पॅनेल आहे. यात 33W चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 10,050mAh बॅटरी आहे.

    वाचा सविस्तर 

  • 18 Dec 2025 03:47 PM (IST)

    18 Dec 2025 03:47 PM (IST)

    Stock Market Today: सेन्सेक्स-निफ्टी घसरले

    Stock Market Today: १८ डिसेंबरला भारतीय शेअर बाजारात मंदी दिसून आली. जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आणि गुंतवणूकदारांच्या सावधगिरीमुळे बेंचमार्क निर्देशांक खाली उघडले. सध्या, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही लाल रंगात व्यवहार करत होते, ज्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (FII) हालचाली आणि जपानी मध्यवर्ती बँकेच्या निर्णयांचा आजच्या व्यापारावर परिणाम होत राहील असे बाजार तज्ञांचे मत आहे.

    वाचा सविस्तर 

  • 18 Dec 2025 02:50 PM (IST)

    18 Dec 2025 02:50 PM (IST)

    EMC 2.0 Investment: ईएमसीमध्ये १.४६ लाख कोटींची गुंतवणूक, देशात १.८० लाख नोकऱ्या होणार निर्माण

    देशभरातील १० राज्यांमध्ये स्थापन झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (EMC २.०) प्रकल्पांमधून अंदाजे १.८० लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पांमध्ये एकूण १,४६,८४६ कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. ही माहिती सरकारने बुधवारी दिली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी लोकसभेत माहिती दिली की, आतापर्यंत ११ ईएमसी प्रकल्प आणि २ कॉमन फॅसिलिटी सेंटर (सीएफसी) प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

  • 18 Dec 2025 02:45 PM (IST)

    18 Dec 2025 02:45 PM (IST)

    काँग्रेसच्या पाठीत खुपसला खंजीर? प्रामाणिकपणाचे प्रतीक असलेल्या राजीव सातवांच्या पत्नीचा भाजप प्रवेश

    राज्यामध्ये महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर जोरदार राजकारण तापले आहे. राजकीय भेटीगाठी वाढल्यानंतर पक्षांतरांमध्ये वाढ झाली आहे. अनेकांनी केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपची वाट धरली आहे. मात्र आज महाराष्ट्र कॉंग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. गांधी कुटुंबाचे अत्यंत निकटवर्तीय मानण्यात येणाऱ्या सातव कुटुंबाने धक्का दिला आहे. महाराष्ट्रातील दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा त्यांचा भाजप (BJP Politics) प्रवेश पार पडला. मात्र यामुळे त्यांनी केवळ कॉंग्रेसचा नाही तर गांधी कुटुंबाचा विश्वास मोडला असल्याचे बोलले जात आहे.

  • 18 Dec 2025 02:40 PM (IST)

    18 Dec 2025 02:40 PM (IST)

    KFC चं चिकन चवीने खात असाल तर जीवाला मुकाला! किचनमध्ये उंदीरमामाच्या उड्या

    सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण संतप्त झाले आहेत. गेल्या काही काळात लोकांच्या जीवना जंक फूडचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. पिझ्झा, बर्गर, फ्रेंज फ्राईस, यांसारखे जंक फूड लोक खात आहे. पण अनेकदा हे पदार्थ स्वच्छ आणि ताजे बनवलेले आहेत का नाही हे लोकांना माहित नसते. सध्या KFC च्या किचनमधील एक धक्कादायाक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही दहा ते १०० वेळा बाहेर नॉनवेज खाताना विचार कराल.

  • 18 Dec 2025 02:32 PM (IST)

    18 Dec 2025 02:32 PM (IST)

    मल्ल्याच्या वाढदिवसाला लंडनमध्ये जमला ‘या’ सर्वच फरार उद्योगपतींचा मेळावा

    भारतात बँकांची हजारो कोटींची फसवणूक करून फरार झालेला ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ अर्थात विजय मल्ल्या (Vijay Mallya) १८ डिसेंबर २०२५ रोजी ७० वर्षांचा झाला आहे. या खास निमित्ताने आयपीएलचे माजी सर्वेसर्वा ललित मोदी (Lalit Modi) यांनी लंडनच्या अत्यंत महागड्या ‘बेलग्रेव्ह स्क्वेअर’ येथील आपल्या निवासस्थानी एक भव्य ‘प्री-बर्थडे’ पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचे फोटो समोर आल्यानंतर पुन्हा एकदा ‘फरार’ असूनही या दोघांच्या चैनीच्या जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

  • 18 Dec 2025 02:15 PM (IST)

    18 Dec 2025 02:15 PM (IST)

    परीक्षा झाली, घरी जायला ऑटो बुक केला, वाटेत ड्रायव्हरने नको ते केलं; बिहार येथील धक्कादायक घटना

    बिहारमधील जहानाबाद इथ एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगी परीक्षा देवून आपल्या घरी परतत होती. वाटेत तिने मगदूमपूर इथ एक ऑटो बुक केली. ऑटोवाला जवळ आला त्याने वेगळ्या मार्गाने ऑटो घरी नेण्याचा प्रयत्न केला. मार्ग वेगळा आहे हे तिच्या लक्षात आल. मुलगी काही करेल तेव्हड्यात त्याने ऑटो ही एका निर्जन स्थळी घेवून गेला. त्याची वाईट नजर त्या मुलीवर पडली होती. त्याने वाटेत ऑटो थांबवला आणि तिच्या सोबत घृणास्पद कृत्य करत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण पोलीसात गेल्यावर ऑटो चालकाला अटक करण्यात आली आहे.

  • 18 Dec 2025 02:05 PM (IST)

    18 Dec 2025 02:05 PM (IST)

    'धुरंधर' ने Fa9la च्या Flipperachi चे बदलले आयुष्य; प्रेक्षकांचे प्रेम पाहून रॅपर भावुक

    "धुरंधर" चित्रपटातील "Fa9la" हे गाणे सध्या बॉक्स ऑफिसवर आणि प्रत्येकाच्या मोबाईल फोनवर धुमाकूळ घालत आहे. या गाण्याची धुन सर्वांना प्रत्येकाच्या फीडमध्ये गाजत असून, प्रेक्षकांना नाचायला भाग पाडत आहे. हे अरबी गाणे बहरीनचे रॅपर फ्लिपेराची याने गायले आहे. आता त्याने खुलासा केला आहे की हे गाणे इतके प्रसिद्ध होईल असे त्याला कधीच वाटले नव्हते. रॅपरने सांगितले की "धुरंधर" चित्रपटामुळे इतिहास रचला गेला आहे.

  • 18 Dec 2025 01:55 PM (IST)

    18 Dec 2025 01:55 PM (IST)

    “कवडीमोल विकण्यापेक्षा स्वाभिमानी आंबेडकरी बाण्याने मतदान करा…”, अंजली आंबेडकर यांचे आवाहन

    बाबासाहेबांच्या नातवाचा अर्थात आपल्या सर्व आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे. निवडणुकीत प्रस्थापित पक्षाकडून सामान्य मतदारांना अनेक आमिषे दाखविली जातात. मते कवडीमोलाने विकत घेतली जातात. मात्र अशाने आपला स्वाभिमान गहाण ठेवला जातो. लाचारी पत्करण्याची वेळ आपणावर येते. हे सर्व टाळण्यासाठी स्वाभिमानी आंबेडकरी बाण्याने, आपल्या हक्काच्या उमेदवाराला निवडून द्या. असे आवाहन अंजली आंबेडकर यांनी धाराशिव येथील जाहीर सभेत केले.

  • 18 Dec 2025 01:45 PM (IST)

    18 Dec 2025 01:45 PM (IST)

    काँग्रेसला खिंडार! 2 माजी महापौरांसह 12 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय तापमान चांगलेच तापल्याच पाहायला मिळत आहे. विविध राजकीय समीकरणे प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेबाबतही महत्त्वाचे संकेत मिळत आहेत. दोन्ही गटांमधील संभाव्य युतीबाबत मुंबईत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. याचदरम्यान सांगलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे.

  • 18 Dec 2025 01:35 PM (IST)

    18 Dec 2025 01:35 PM (IST)

    ‘खूप ऐकलं, खूप सोसलं…’, पप्पू यादवचा मुलगा सार्थक रंजनची IPL मध्ये वर्णी

    “कठीण काळ हा क्षणिक असतो, पण जे दृढनिश्चयी आणि बलवान असतात ते संकटांना तोंड देतात आणि शेवटी यशस्वी होतात.” अशी जुनी म्हण आहे आणि सध्या चर्चेत असलेल्या खेळाडू सार्थक रंजनने ही जुनी म्हण सिद्ध केली आहे. मंगळवारी (१६ डिसेंबर २०२५) अबू धाबी येथे झालेल्या आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावात त्याला कोलकाता नाईट रायडर्सने ३० लाख रुपयांना विकत घेतले. तेव्हापासून सार्थक रंजन चर्चेत आहे.

  • 18 Dec 2025 01:25 PM (IST)

    18 Dec 2025 01:25 PM (IST)

    कुमार सानूचा Ex पत्नीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल, मागितली ३० लाख रुपयांची भरपाई

    प्रसिद्ध बॉलीवूड गायक कुमार सानू यांनी त्यांची एक्स पत्नी रीता भट्टाचार्य यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. गायक ३० लाख रुपयांची भरपाई मागितली आहे. आणि रीता यांनी कथितपणे केलेल्या बदनामीकारक विधानांच्या मुलाखती काढून टाकण्याची मागणी करत आहेत. या खटल्याची सुनावणी १७ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

  • 18 Dec 2025 01:15 PM (IST)

    18 Dec 2025 01:15 PM (IST)

    घराचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार? सरकारची PMAY 2.0 योजना, आता सबसिडी जाणार थेट कर्ज खात्यात

    सर्वांसाठी घरे’ या वाक्यांतील ‘सर्वांसाठी’ हा शब्द या वाक्यात असला तरी भारतात नेहमीच घरांच्या बाबतीत अशी परिस्थिती बिलकुल नाही. औपचारिक कर्ज मिळण्यात आणि घरमालकीचे स्वप्न पुर्ण करण्यात अजूनही व्यावहारिक त्याचबरोबर आर्थिक पातळीवर अनेक अडथळे आहेत. PMAY 1.0 योजनेतील क्रेडिट-लिंक्ड सबसिडी योजना ही सुविधा सर्वात शक्तिशाली साधन ठरले होते. आता, PMAY 2.0 धोरणातील व्याज अनुदान योजनेच्या आधारे या मार्गाची पुढे वाटचाल सुरू आहे. या योजनेचे मार्गदर्शक तत्त्वे या योजनेसाठी कोण व्यक्ती पात्र आहेत, हे निश्चित करतात. तसेच ही पात्रता अतिशय निष्पक्षरित्या सुनिश्चित करण्यासाठी अतिशय पारदर्शक मापदंडही ठरविण्यात आलेले आहेत.

  • 18 Dec 2025 01:06 PM (IST)

    18 Dec 2025 01:06 PM (IST)

    बारामतीत आज राष्ट्रवादीच्या प्रचाराची सांगता सभा; उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार

    बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची सांगता आज (दि. १८) सायंकाळी साडेपाच वाजता बारामती शहरातील शारदा प्रांगण येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी दिली. आज होणाऱ्या राष्ट्रवादीच्या सांगता सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुढील तीन दिवस बारामतीत मुक्काम करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • 18 Dec 2025 01:00 PM (IST)

    18 Dec 2025 01:00 PM (IST)

    जुन्या वादातून दोन मित्रांनी 35 वर्षीय तरुणाची केली हत्या

    धाराशिवच्या परांडा तालुक्यात कंडारी–सोनारी रस्त्यावर अपघाताचा बनाव करून 35 वर्षीय मोतीराम जाधव यांचा खून केल्याचा उघडकीस आला आहे. जुन्या वादातून दोन मित्रांनी जड वस्तूने डोक्यात वार केल्याचा आरोप आहे.

  • 18 Dec 2025 12:50 PM (IST)

    18 Dec 2025 12:50 PM (IST)

    8 वीच्या मुलीसोबत ऊसाच्या शेतात आळीपाळीने अत्याचार

    सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये 8 वीतील शाळकरी मुलीवर दोघांनी ऊसाच्या शेतात आळीपाळीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. पीडितेला विवस्त्र अवस्थेत सोडून आरोपी फरार झाले. दोघांना अटक; पोक्सोअंतर्गत गुन्हा.

  • 18 Dec 2025 12:40 PM (IST)

    18 Dec 2025 12:40 PM (IST)

    जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या

    छत्रपती संभाजीनगरच्या जटवाडा रस्ता परिसरात जमिनीच्या वादातून ओहरगावचे माजी सरपंच दादा पठाण यांची 11 जणांनी लाठ्या-रॉडने निर्घृण हत्या केली. महिलांच्या विनवण्यांकडे दुर्लक्ष करत हल्ला झाला. एक आरोपी अटकेत, इतर फरार.

  • 18 Dec 2025 12:30 PM (IST)

    18 Dec 2025 12:30 PM (IST)

    वृद्धेचा अमानुष खून आणि घटनास्थळी राहिलेलं घड्याळ

    धुळेतील मोहाडी उपनगरात 75 वर्षीय वृद्धेची चोरीच्या उद्देशाने निर्घृण हत्या झाली. घटनास्थळी सापडलेल्या मनगटी घड्याळामुळे पोलिसांना धागा मिळाला आणि अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करून खुनाचा उलगडा करण्यात आला. आरोपी हे चोरीच्या उद्देशाने घरात शिरले होते, मात्र महिला जागी झाल्याने निर्घृण हत्या केली.

  • 18 Dec 2025 12:20 PM (IST)

    18 Dec 2025 12:20 PM (IST)

    पुण्यात बंडू आंदेकरच्या वकिलांवर गुन्हा दाखल

    गँगस्टर बंडू आंदेकर याचा नातू तुषार वाडेकर व स्वराज वाडेकर यांच्या ‘हीच आईची इच्छा’ या इमारतीमध्ये घरझडती घेताना दोन वकिलांनी कारवाईला विरोध करुन सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी वकिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • 18 Dec 2025 12:13 PM (IST)

    18 Dec 2025 12:13 PM (IST)

    घटस्फोटासाठी दबाव टाकणाऱ्या आई-वडिलांची केली निर्घृण हत्या

    उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये इंजिनियर मुलाने घटस्फोटाच्या वादातून आई-वडिलांची हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून गोमती नदीत फेकले. बहिणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत प्रकरण उघड केले.

  • 18 Dec 2025 12:02 PM (IST)

    18 Dec 2025 12:02 PM (IST)

    भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठीचे हे प्रयत्न - खासदार संजय राऊत

    माणिकराव कोकाटे यांना वाचवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू आहे. सरकार त्यातून संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतो आणि शेवटपर्यंत त्यांच्या मागे उभे राहतो हा संदेश या प्रकरणातून देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी, जे आमदार-खासदार, मंत्री भ्रष्टाचारी आहेत, त्यांनी आमच्या पक्षात यावं, त्यांना पूर्ण संरक्षण मिळेल हाच तो संदेश आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

  • 18 Dec 2025 11:55 AM (IST)

    18 Dec 2025 11:55 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राम सुतार यांच्या मुलाला फोन करुन सांत्वन

    प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना सांत्वना दिली. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणाले की, रामभाऊंच्या निधनाने जागतिक कीर्तीचा कलाकार आपल्यातून निघून गेला. प्रमाणबद्धता आणि त्यातील जिवंतपणा हे त्यांच्या कलेचे वैशिष्टय होते. काही दिवसांपूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी गेलो होतो, पुरस्कार स्वीकारताना त्यांनी 'महाराष्ट्र माझा' या गीताच्या ओळी उच्चारल्या तेव्हा भारावून गेलो होतो. त्यांची कला शतकानुशतके आपल्या स्मरणात राहील आणि प्रत्येक शिल्प पाहताना त्यांचेच स्मरण होईल, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

  • 18 Dec 2025 11:45 AM (IST)

    18 Dec 2025 11:45 AM (IST)

    धनंजय मुंडे आणि अमित शाहांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

    माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद काढून घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी दिल्लीवारी केली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

  • 18 Dec 2025 11:35 AM (IST)

    18 Dec 2025 11:35 AM (IST)

    मुरलीधर मोहोळ यांनी राम सुतार यांना वाहिली श्रद्धांजली

    केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी शिल्पकार राम सुतार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मोहोळ म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीतील नेते, राष्ट्रपुरुष आणि महापुरुषांच्या भव्य पुतळ्यांतून त्यांनी इतिहासाला आकार दिला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारख्या जगातील सर्वोच्च पुतळ्याच्या माध्यमातून भारताची शिल्पपरंपरा जागतिक पटलावर ठसठशीतपणे मांडण्याचं ऐतिहासिक कार्य त्यांनी केलं. त्यांच्या कलेत राष्ट्रभक्ती, प्रेरणा आणि कालातीत मूल्यांचा प्रत्यय येतो. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचं कार्य सदैव मार्गदर्शक ठरेल. या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो ! अशा शोक भावना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

  • 18 Dec 2025 11:25 AM (IST)

    18 Dec 2025 11:25 AM (IST)

    प्रज्ञा सातव यांचा आमदारकीची राजीनामा

    कॉंग्रेसच्या नेत्या आणि आमदार प्रज्ञा सातव यांनी आमदारकीची राजीनामा दिला आहे. भाजपमध्ये प्रवेश करत असलेल्या प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला असून लवकरच त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

  • 18 Dec 2025 11:14 AM (IST)

    18 Dec 2025 11:14 AM (IST)

    Ram Sutar Passed Away : प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन

    आपल्या शिल्प कलाकारीने कलेचा अविष्कार घडवणाऱ्या राम सुतार यांनी काल (दि.17) अखेरचा श्वास घेतला. जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन झाले आहे, गुजरातमधील सर्वात उंच पुतळा असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे डिझाइन करणारे राम सुतार यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी रात्री उशिरा नोएडा येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मुलाने गुरुवारी सकाळी याबाबत माहिती दिली आहे. राम सुतार हे १०० वर्षांचे होते आणि बऱ्याच काळापासून वयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते.

  • 18 Dec 2025 11:00 AM (IST)

    18 Dec 2025 11:00 AM (IST)

    रशियात शिक्षणासाठी गेलेल्या उत्तराखंडच्या तरुणाचा युक्रेन युद्धात मृत्यू

    एक खळबळजनक आणि दु:खद घटना समोर आली आहे. उत्तरखंडमधील एक तरुणाचा युद्धात मृत्यू झाला आहे. यामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या तरुणाचे नाव राकेश कुमार असून चो उत्तराखंडमधील उधमसिंग जिल्ह्यातील सितारगंज येथील शक्तीफार्म गावाच रहिवाशी आहे. रशियात युद्धादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण गाव हळहळले आहे. वाचा सविस्तर

     

  • 18 Dec 2025 10:57 AM (IST)

    18 Dec 2025 10:57 AM (IST)

    प्रथमेश परब ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपटामधून करणार कमबॅक

    राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या गोट्या नावाचा तरूण आणि त्याचे मित्र गँग तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय धमाल होते याची रंजक गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार असून, २६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट देखील धमाकेदार आहे. हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.

  • 18 Dec 2025 10:54 AM (IST)

    18 Dec 2025 10:54 AM (IST)

    धुरंधर चित्रपट पाहून आलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकाची भावूक प्रतिक्रिया

    इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये व्यक्ती सांगतो की तो पाकिस्तानच्या कराची येथे मोठा झाला आहे. चित्रपटाचे वर्णन करताना त्याने सांगितले की, चित्रपटातील अनेक पात्रांशी आणि नावांशी तो खूप जवळचा वाटतो. तो म्हणतो की चित्रपटात दाखवलेली अनेक नावे आणि ठिकाणे त्याने लहानपणापासून ऐकलेली आहेत. असे असूनही, तो चित्रपटाला केवळ राजकीय दृष्टिकोनातूनच नाही तर एक चित्रपट म्हणून पाहतो.

  • 18 Dec 2025 10:40 AM (IST)

    18 Dec 2025 10:40 AM (IST)

    जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या

    छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहराच्या जटवाडा रस्ता परिसरातील ओहरगावचे माजी सरपंचाची ११ जणांनी मिळून निर्घृण हत्या केली. मृतकाचे नाव दादा सांहू पठाण असे आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. मृतकाच्या कुटुंबीयांनी हल्लेखोरांसमोर हात जोडून विनवण्या केले तरीही हल्लेखोर थांबले नाही. या टोळीने लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

  • 18 Dec 2025 10:30 AM (IST)

    18 Dec 2025 10:30 AM (IST)

    सोनं-चांदीचे भाव आभाळाला!

    अमेरिकेच्या डॉलरमध्ये झालेल्या किंचित वाढ आणि नफावसुली झाल्यामुळे गुरुवारी 18 डिसेंबरला देशांतर्गत सराफ बाजारात सोने आणि चांदीचे दर घसरल्याचे दिसले. भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 263 रुपयांनी कमी झाले असून 1,34,631 रुपये आहे. आहे, तर चांदीचे भाव 1187 रु. रुपयांनी स्वस्त होऊन 1,06,251 रुपये किलोवर घसरले.  आदल्या दिवशी मात्र 17 डिसेंबरला सलग पाचव्या दिवशी सोन्याचे भाव वाढतच राहिले.

  • 18 Dec 2025 09:48 AM (IST)

    18 Dec 2025 09:48 AM (IST)

    संजय राऊत घेणार शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

    राज्यातील महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार, सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. काँग्रेसने स्वतःला आघाडीपासून दूर करत केले. स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या शरद पवारांची भेट घेणार आहेत.

  • 18 Dec 2025 09:38 AM (IST)

    18 Dec 2025 09:38 AM (IST)

    देशभरात AI आधारित टोल कलेक्शन सिस्टिम लवकरच येणार

    भारतीय महामार्ग व्यवस्था एका हाय टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट वाहतूक नेटवर्कमध्ये रूपांतरित होण्यास सज्ज आहे, ज्याचा फायदा वाहन चालकांना सर्वाधिक होईल. येत्या काही वर्षांत भारतातील महामार्ग प्रवाशांना लक्षणीय दिलासा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांनी घोषणा केली आहे की 2026 च्या अखेरीस देशभरात AI-आधारित डिजिटल टोल कलेक्शन सिस्टम पूर्णपणे लागू केली जाईल. यानंतर, टोल प्लाझावर थांबण्याची आवश्यकता राहणार नाही.

Marathi Breaking News Updates : राजधानी दिल्लीत प्रदूषणाची पातळी आणखी वाढताना दिसत आहे. दिल्लीत विषारी धुराचे दाट आवरण असल्याने, प्रदूषण नियंत्रण उपाय आणखी कडक करण्यात आले आहेत. आजपासून फक्त BS-6 वाहनांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी आहे. वैध प्रदूषण नियंत्रण (PUC) प्रमाणपत्र नसलेल्या पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठ्यावर बंदी घालण्यात आली आहे.

दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल पंपांवर PUC चाचणीसाठी वाट पाहणाऱ्या वाहनधारकांमध्ये लांबच्या लांब रांगा लागल्याचे पाहिला मिळाले. अनेक पंपांवरील सर्व्हर बंद पडले होते. ज्यामुळे चाचणीत व्यत्यय आला आणि जनतेची गैरसोय वाढली होती. परिस्थिती हाताळण्यासाठी पेट्रोल पंपांवर अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले. अनेक पंपांवरील PUC मशीन सर्व्हर बंद होते, ज्यामुळे चाचणीमध्ये व्यत्यय आला आणि बरेच लोक तासनतास वाट पाहत होते.

Web Title: Marathi breaking live updates marathi top news crime news marathi live updates international news national news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 08:51 AM

Topics:  

  • Marathi News
  • Navarashtra Live Update
  • navarashtra news update

संबंधित बातम्या

Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर
1

Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर

Raju Shetti : थकीत एफआरपी  प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक
2

Raju Shetti : थकीत एफआरपी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक

Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
3

Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न

‘तस्करी’ मध्ये इमरान हाश्मीसोबत झळकणार ‘ही’ मराठी अभिनेत्री; संपूर्ण स्टारकास्टची दाखवली झलक
4

‘तस्करी’ मध्ये इमरान हाश्मीसोबत झळकणार ‘ही’ मराठी अभिनेत्री; संपूर्ण स्टारकास्टची दाखवली झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.