मोदी सरकारची मोठी घोषणा! उज्ज्वला योजनेचा विस्ताराला मंजुरी (Photo Credit- X)
Pradhan Mantri Ujjwala Yojana: महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा (PMUY) विस्तार करत आणखी २५ लाख महिलांना मोफत एलपीजी (LPG) कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ही नवीन जोडणी (कनेक्शन) दिली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नवरात्रीच्या या शुभप्रसंगी मी उज्ज्वला परिवाराशी जोडल्या गेलेल्या सर्व माता आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. हा निर्णय केवळ त्यांना आनंदच देणार नाही, तर महिला सक्षमीकरणाच्या आमच्या संकल्पालाही बळकट करतो.”
PM Modi congratulates Ujjwala beneficiaries after Centre approves release of 25 lakh additional LPG connections under PMUY scheme Read @ANI Story | https://t.co/2Y4biLDbHW#PMModi #Ujjwalabeneficiaries #LPG pic.twitter.com/8PeRJI9HMs — ANI Digital (@ani_digital) September 22, 2025
उज्ज्वला योजनेअंतर्गत २५ लाख नवीन एलपीजी कनेक्शन जारी करण्याच्या या निर्णयावर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘नवरात्रीच्या सुरुवातीसह, उज्ज्वला योजनेअंतर्गत २५ लाख मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महिलांप्रती देवी दुर्गा समान सन्मानाची आणखी एक ग्वाही आहे,’ असे पुरी यांनी म्हटले आहे. या नवीन २५ लाख कनेक्शनसह देशभरात उज्ज्वला कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढून १०.६० कोटी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, केंद्र सरकार प्रत्येक कनेक्शनवर २,०५० रुपये खर्च करेल, ज्यामुळे लाभार्थींना मोफत एलपीजी सिलिंडरसह गॅस शेगडी आणि रेग्युलेटरही मोफत मिळू शकेल. पुरी म्हणाले, “उज्ज्वला योजना ही केवळ एक योजना नसून, देशात एक मोठी क्रांती बनली आहे, ज्याची ज्योत देशाच्या कानाकोपऱ्यात, दुर्गम भागातही पोहोचली आहे. सध्या मोदी सरकारकडून मिळत असलेल्या ३०० च्या सबसिडीसह १०.३३ कोटींहून अधिक उज्ज्वला कुटुंबांना सिलिंडर फक्त ५५३ मध्ये मिळत आहे. ही किंमत जगभरातील एलपीजी उत्पादक देशांपेक्षाही कमी आहे.”