flight

क्रिकेट वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी झालेल्या गर्दीने एका दिवसात विमानाने प्रवास करण्याचा विक्रम मोडला आहे.

  क्रिकेट वर्ल्ड कप (World Cup Final 2023)  भारताला जरी नाही मिळाला मात्र, या वर्ल्ड कपमुळे भारतीय  एअरलाइन्समात्र मालामाल झाली आहे. वर्ल्ड कपचा अंतीम सामन्याच्या निमित्ताने प्रवाशांनी  एका दिवसात विमानाने प्रवास करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. शनिवारी देशभरात सुमारे ४.६ लाख लोकांनी हवाई प्रवास केला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यंदाही दिवाळीत प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. पण, भारताने वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचल्याने अहमदाबादला पोहोचण्यासाठी लोकांमध्ये उत्साह दिसून आला आणि एक नवा विक्रम रचला गेला. या काळात विमान कंपन्यांनी वाढलेल्या भाड्यातूनही भरपूर कमाई केली.

  सणासुदीच्या काळात वाढवलं भाडं

  या सणासुदीच्या काळात एका दिवसात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या कधीही 4 लाखांपर्यंत पोहोचली नाही. यासाठी विमान कंपन्यांना जबाबदार धरले जात होते. वाढत्या मागणीमुळे त्यांनी दिवाळीच्या महिनाभर आधी विमान भाड्यात लक्षणीय वाढ केली होती. एवढ्या जास्त भाड्यामुळे, मोठ्या संख्येने लोकांनी ट्रेनच्या एसी क्लासचे तिकीट काढले. त्यामुळे विमान कंपन्यांची वाट लागली. भाडे वाढवण्याची त्यांची फार पूर्वीची बोली उलटली. पण, विश्वचषक फायनलची २० ते ४० हजार रुपयांची तिकिटेही लोकांनी खरेदी केली.

  सिंधिया-अदानी यांनी अभिनंदन केले

  विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोशल मीडियावर याबद्दल लिहिले की, 18 नोव्हेंबर रोजी भारतीय विमान उद्योगाने इतिहास रचला. या दिवशी आम्ही ४,५६,७४८ प्रवाशांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक केली. शनिवारी मुंबई विमानतळावरही एकाच दिवसात सर्वाधिक प्रवाशांची गर्दी झाली. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी X वर लिहिले की, ही आमच्यासाठी ऐतिहासिक संधी आहे. मुंबई विमानतळावर एकाच दिवसात १.६१ लाखांहून अधिक प्रवासी दाखल झाले.

  सप्टेंबरपासूनच वाढवलं होतं भाडं

  विमान कंपन्यांनी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आगाऊ बुकिंगसाठी भाडे वाढवण्यास सुरुवात केली होती. ऑक्‍टोबरच्‍या तिसर्‍या आठवड्यापासून सुरू होणा-या सणासुदीचा फायदा उठवण्‍याच्‍या एअरलाइन्सच्‍या या हालचालीचा उलटा परिणाम झाला आणि ते रेल्वेकडे वळले. पण, दिवाळी आणि छठपूजा आणि क्रिकेटहून परतलेल्या लोकांनी एअरलाईन्सची पर्स भरली. लोकांनी खूप महागडी तिकिटे खरेदी केली.सोमवारी अहमदाबाद ते मुंबई तिकीटाची किंमत 18,000 ते 28,000 रुपये आहे. तसेच अहमदाबाद ते दिल्लीचे तिकीट 10 ते 20 हजारांच्या दरम्यान आहे. मात्र, भविष्यात हे भाडे कमी होणार असल्याचे दिसून येत आहे.