Photo Credit- X@Sanjay Raut संजय राऊतांच्या त्या ट्विटर पोस्टचा नेमका अर्थ काय?
मुंबई : देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प जाहीर करत आहेत. देशामध्ये मोदी सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम देखील निर्मला सीतरमण यांच्यानावे होत आहे. यावर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी संवाद साधला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पाकडून अपेक्षा असून सर्वसामान्य व्यक्तीच्या घरी लक्ष्मी येणार असल्याचे बोलले होते. या मुद्द्यांवरुन आता संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “आतापर्यंत या देशातल्या अर्थव्यवस्थेबाबत देशाच्या पंतप्रधानांनी किंवा या सरकारने ज्या ज्या योजना आखल्या त्या देशाची अर्थव्यवस्था मग नोटबंदी असेल, जी एस टी असेल अशा अनेक त्यांच्यामुळे प्रधानमंत्री अशा काही घोषणा करतात, तेव्हा सामान्य जनतेच्या पोटात दुखीचा गोळा येतो . हे सरकार गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी अजिबात नाही 85 कोटी लोकांना फुकट धान्य देणं हे काही अर्थव्यवस्था चांगलं असल्याचं लक्षण नाही. ज्या पद्धतीने रुपया लुडकत लुडकत खाली गाढला गेला 87 रुपयावर एक डॉलर गेला हे काही चांगल्या अर्थव्यवस्थेचे लक्षण नाही. त्यांचं म्हणणं आहे गोरगरिबांवर लक्ष्मी प्रसन्न व्हावे असे मी प्रार्थना करतो,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “आता देशातील गोरगरीब कोण? गेल्या दहा वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ती भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीवर आणि गेल्या दहा वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ती मोदींचे मित्र गौतम अदाणीवर, या देशात सध्या सर्वात गरीब गौतम अडाणी हे मोदींचे, अमित शहांचे भाजपचे मित्र आहेत लक्ष्मी यांच्यावर प्रसन्न व्हावी यासाठी देशाच्या आर्थिक योजना अर्थसंकल्प हे राबवल्या जातात त्याच्यामुळे मोदींच्या बोलण्यावर गरिबांनी विश्वास ठेवू नये,” अशा कडक शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कॉंग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर टिप्पणी केली. राष्ट्रपतींचा उल्लेख त्यांनी गरिब बाई (पूअर लेडी) असा केला. यामुळे सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. यावर खासदार राऊत म्हणाले की, “सोनिया गांधी काय बोलल्या आहेत कोणत्या संदर्भात बोलल्या आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे, मी त्यांचा वक्तव्य ऐकलेलं नाही. या देशाच्या राष्ट्रपती पदावर एक पूअर लेडी बसलेली असेल तर ते कौतुकास्पद आहे. सामान्य घरातली स्त्री गरीब घरातली स्त्री या देशातली राष्ट्रपती झाली आणि त्याला जर पूवर म्हणतात, तर त्यात मला काही चुकीचं वाटत नाही सामान्य माणसाला सर्वोच्च पदावर बसवण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल पण बसले असतील पूवर लेडी पूवर मॅन म्हणून त्या अर्थाने सुद्धा पूवर होतं. शरद पवार यांच्या विषयी भटकती आत्मा म्हणतात, उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणतात तसंच पूवर लेडी ही भाषावली हे शब्द रत्न उधळायला सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली राजकारणात, राष्ट्रपतींचा सन्मान राहिला पाहिजे राष्ट्रपतींविषयी अपशब्द वापरला जाऊ नये पुअर लेडी आणि पूवर हा शब्द असंसदिय नाही,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.