#MyModiStory : 'पंतप्रधान माझे आदेश मोडूच शकत नाहीत'; मोदींच्या वाढदिवशी काँग्रेसच्या 'या' व्हिडिओमुळे मोठे राजकीय वादळ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७५ व्या वाढदिवशी काँग्रेसने एक एआय व्हिडिओ प्रसिद्ध करून अदानी-समंध जोडला.
#MyModiStory हॅशटॅगखाली शुभेच्छांचा वर्षाव सुरू असतानाच काँग्रेसच्या या व्यंगात्मक पावलाने राजकीय वादळ उठले.
सोशल मीडियावर या व्हिडिओवरून भाजप-समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा सुरू.
On PM Modi Birthday Congress AI Video : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७५ वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा होत असतानाच, राजकारणात एक नवीन वादळ उठले आहे. सोशल मीडियावर #MyModiStory हॅशटॅगखाली शुभेच्छांचा, संस्मरणीय अनुभवांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू असताना, काँग्रेस पक्षाने या दिवसाचाच वापर करून एक वेगळा राजकीय वार केला. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या एका एआय व्हिडिओमुळे देशातील राजकीय वातावरण अचानक तापले आहे.
या व्हिडिओमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्यासारखा दिसणारा एक एआय-जनरेटेड पात्र दाखवण्यात आला आहे. तो पात्र जाड गुजराती उच्चारात हिंदी बोलत, स्वतःला अदानी असल्याचे सूचित करताना म्हणतो की, “नरेंद्र मोदी माझे दीर्घकाळचे निष्ठावंत आहेत. मोदींनी माझ्या आदेशांना कधीही विरोध केला नाही. मी जे काही मागितले कारखाने, जमीन, निविदा, सौदे मोदींनी ते सर्व माझ्या नावावर केले.” हा संवाद ऐकताच सोशल मीडियावर खळबळ माजली. एकीकडे भाजप समर्थकांनी याला काँग्रेसची पातळी खालावल्याची टीका केली, तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी याला ‘सत्याचे व्यंगात्मक दर्शन’ असे संबोधले.
#MyModiStory pic.twitter.com/7AaFn0Xkbz
— Congress (@INCIndia) September 17, 2025
credit : social media
याआधीही काँग्रेसने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून वाद निर्माण केला होता. काही दिवसांपूर्वी बिहार काँग्रेसने पंतप्रधानांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा एआय व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यात हिराबेन यांच्या तोंडी मोदींना त्यांच्या नावाचे राजकारण केल्याबद्दल फटकारल्याचे दाखवले होते. त्या व्हिडिओनंतर प्रचंड संताप उसळला होता. आता पुन्हा अशाच पद्धतीने एआय व्हिडिओ प्रसिद्ध करून काँग्रेसने आपली राजकीय रणनीती उघड केली आहे. निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसने केलेली ही खेळी ही मोदी-अदानी नात्यावरील थेट टीका म्हणून पाहिली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी त्यांचे लाखो समर्थक सोशल मीडियावर #MyModiStory या हॅशटॅगखाली आपले अनुभव शेअर करत होते. अनेकांनी मोदींशी झालेल्या थोडक्या भेटी, त्यांचे प्रेरणादायी शब्द, तसेच त्यांच्याकडून मिळालेला पाठिंबा याची आठवण शेअर केली. पण काँग्रेसने नेमका हाच हॅशटॅग वापरून व्यंगात्मक व्हिडिओ टाकल्याने संपूर्ण वातावरणाला नवे वळण मिळाले. एकीकडे शुभेच्छांचा पूर, तर दुसरीकडे आरोपांचा त्सुनामी अशी द्वंद्वात्मक स्थिती सोशल मीडियावर दिसली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Stop War : ‘वेळ आली आहे…’ रशियाच्या हल्ल्याने युक्रेनमध्ये विध्वंस; संतप्त झेलेन्स्कीने केली ‘मोठी’ घोषणा, VIDEO
गमतीशीर बाब म्हणजे काँग्रेसकडून हा वादग्रस्त व्हिडिओ प्रसारित झाला असतानाच, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र पंतप्रधानांना सभ्य पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विट करून मोदींच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याची कामना केली. राहुल गांधींच्या या ट्विटला ‘राजकीय सभ्यता’चे उदाहरण मानले जात असताना, पक्षाकडून आलेल्या व्हिडिओमुळे काँग्रेसमधील रणनीतीतही मतभेद असल्याचे संकेत मिळाले.
या वादाच्या गदारोळात अनेक दिग्गज व्यक्तींनी मात्र आपले वैयक्तिक अनुभव शेअर करून हॅशटॅगला सकारात्मक रंग दिला.
विश्वनाथन आनंद, माजी जागतिक बुद्धिबळ विजेता, यांनी सांगितले की एका अनौपचारिक संभाषणादरम्यान मोदींना कळले की त्यांना गुजराती थाळी आवडते. त्यानंतर त्यांनी स्वतः आनंदला अतिथीगृहात नेऊन जेवणाची मेजवानी दिली होती.
मोहम्मद सिराज, भारतीय वेगवान गोलंदाज, यांनी आठवण सांगितली की २०२३ च्या विश्वचषक फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये मोदींनी संपूर्ण संघाला दिलेले प्रेरणादायी शब्द त्यांच्या मनाला भिडले. विजय-पराभव कोणताही असो, संघाच्या पाठीशी उभे राहण्याचा त्यांचा स्वभावच वेगळा आहे.
या कथांनी सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतले.
या सगळ्या प्रकरणाने एक मोठा प्रश्न समोर आणला राजकारणातील एआयचा नैतिक वापर कुठे थांबायला हवा? निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे एआयच्या साहाय्याने तयार केलेले खोटे व्हिडिओ, व्यंगचित्रे आणि प्रचार साहित्य वाढताना दिसत आहे. काँग्रेसचा हा व्हिडिओ ही एआयच्या मर्यादा आणि राजकीय जबाबदारी या दोन्ही विषयांवर प्रश्न उपस्थित करणारी घटना ठरली आहे. जनतेला काय खरं आणि काय खोटं हे कळणं कठीण होत असताना, राजकीय पक्षांनी या साधनांचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Zapad 2025 : ‘भारताच्या ‘अशा’ निर्णयाने अमेरिका अवाक्…’ पुतिन स्वतः पोहोचले ग्राउंड झिरोवर; संपूर्ण जगभर हलकल्लोळ
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी काँग्रेसने सोडलेला हा एआय व्हिडिओ बॉम्ब खरं तर एक राजकीय रणनीतीचं शस्त्र ठरला आहे. भाजप-समर्थकांनी त्याला टीकेचा धनी केले, तर काँग्रेस समर्थकांनी त्याला धाडसी पाऊल मानले. मात्र, या प्रकरणाने हे स्पष्ट केले की एआय आता राजकारणाच्या मैदानात एक ‘गेम-चेंजर’ ठरत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सकारात्मक कथा शेअर करणाऱ्यांच्या गर्दीत उठलेले हे राजकीय वादळ पुढे किती मोठं रूप धारण करतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.