उरी सेक्टरमध्ये भारतीय जवान शहीद (फोटो- ani)
जम्मू काश्मीर: पाकिस्तान मधून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर जोरदार गोळीबार सुरू केला. हा गोळीबार सीमेच्या आत मध्ये घुसण्यासाठी होता. दरम्यान या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पुरी सेक्टरमध्ये भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन देखील, सीमेशेजारील शत्रुराष्ट्र सुधारण्याचे नाव घेताना दिसून येत नाही.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पाकिस्तानचे अनेक सैन्य ठिकाणे , एअर बेस उध्वस्त केले. तरीही पाकिस्तान आपल्या नापाक कारवायांपासून मागे हटताना दिसून येत नाहीये. भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न त्याने सुरूच ठेवला आहे.
जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टर येथे दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला. या दरम्यान भारतीय लष्कर आणि घुसखोरांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे.
कुलगाम चकमकीत २ जवान शहीद
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल भागात गेल्या ९ दिवसांपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. या चकमकीत रात्रीच्या वेळी झालेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम येथील अखल भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीचा आज (9 ऑगस्ट) नववा दिवस आहे. रात्रभर परिसरात मोठ्या स्फोटांचे आणि गोळीबाराचे आवाज येत होते. या दरम्यान, शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबारात दोन लष्करी जवान शहीद झाले, तर इतर दोन सैनिक जखमी झाले. भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप यात सहभागी आहेत.
गेल्या आठवड्यात, सुरक्षा दलांनी संशयित अतिरेक्यांच्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोन तैनात केले आहेत तर लष्कराचे हेलिकॉप्टर कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी आकाशात घिरट्या घालत आहेत. वरिष्ठ सुरक्षा अधिकारी प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नियमितपणे या भागाला भेट देत आहेत. वरिष्ठ सुरक्षा अधिकारी दहशतवादविरोधी कारवाईचा आढावा घेण्यासाठी नियमितपणे या भागाला भेट देत आहेत.
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला होऊ शकतो? यावेळी ‘हे’ ठिकाण लक्ष्यावर
जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला होऊ शकतो?
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, दहशतवादी पुन्हा एकदा त्यांचे नापाक हेतू बाळगत आहेत. खोऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर दहशतवादी हल्ल्यांची शक्यता असल्याची विश्वसनीय गुप्तचर माहिती मिळाली आहे. गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे.