भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Nodi) आज मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी कमलापती रेल्वे स्थानकावरून पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान मोदींनी राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून भोपाळ-इंदूर, वंदे भारत एक्सप्रेस, भोपाळ (राणी कमलापती) – जबलपूर वंदे भारत एक्सप्रेससह पाच वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
[read_also content=”‘दिल से बुरा लगता है’, म्हणत सगळ्यांना हसवणारा प्रसिद्ध कॉमेडी यूट्यूबर देवराnartendraज पटेलचं निधन, रस्ते अपघातात ओढावला मृत्यू! https://www.navarashtra.com/movies/youtuber-devraj-patel-dies-in-accident-in-chhattisgarh-nrps-423552.html”]
भोपाळच्या राणी कमलापती स्थानकावरून पंतप्रधान मोदींनी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यामध्ये रांची-पाटणा वंदे भारत एक्सप्रेस, धारवाड-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस, गोवा (मडगाव)-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा समालेश आहे.
मध्य प्रदेश: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भोपाल के रानी कमलापति रेलवे स्टेशन से 5 वंदे भारत ट्रेनों को हरी झंडी दिखाई। pic.twitter.com/cezKJbC4AK
— ANI_HindiNews (@AHindinews) June 27, 2023
पंतप्रधान मोदींनी मुलांशी संवाद साधला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनमध्ये शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
#WATCH मध्य प्रदेश: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भोपाल के रानी कमलापति रेलवे स्टेशन पर वंदे भारत ट्रेन में स्कूली छात्रों के साथ बातचीत की। https://t.co/Z2adSzIoRM pic.twitter.com/GhTwSB7Y6W
— ANI_HindiNews (@AHindinews) June 27, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांचा भोपाळमध्ये रोड शो आयोजीत करण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंतप्रधानांचा भोपाळमधील रोड शो आणि शहडोलचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. मोदींचा राजभवन ते भोपाळमधील पोलीस नियंत्रण कक्ष असा प्रस्तावित रोड शो खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. दोन महिन्यांत ही दुसरी वेळ आहे, जेव्हा भोपाळमध्ये पंतप्रधानांचा रोड शो रद्द करण्यात आला आहे.