'आकड्यांमध्ये लपवले गरिबांचे मृतदेह, हेच भाजप मॉडेल'; कुंभमेळ्यातील मृतांच्या आकडेवारीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
प्रयागराज येथे २०२५ च्या महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. चेंगराचेंगरीत किमान ८२ लोकांचा मृत्यू झाला असून, सरकारने केवळ ३७ मृत्यूंचीच अधिकृत नोंद केली आहे, असा दावा एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने एका रिपोर्टमध्ये केला आहे. त्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर तोफ डागली आहे.
राहुल गांधींना अपरिपक्व म्हणणे पडले महागात; कॉंग्रेस नेत्याला पक्षाने थेट दाखवला बाहेरचा रस्ता
या रिपोर्टवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका केली आहे.”हा अहवाल दाखवतो की कुंभमधील मृत्यूंची आकडेवारी लपवली गेली, जशी कोविड काळात गरीबांच्या मृतदेह आकडेवारीतून गायब करण्यात आले. प्रत्येक मोठ्या रेल्वे अपघातानंतरही सत्य लपवलं जातं, हेच तर भाजप मॉडेल आहे. गरिबांची मोजदाद नाही, म्हणजे जबाबदारीही नाही!”
BBC की रिपोर्ट बताती है कि कुंभ मेले की भगदड़ में हुई मौतों के आंकड़े छुपाए गए।
जैसे COVID में गरीबों की लाशें आंकड़ों से मिटा दी गई थी।
जैसे हर बड़े रेल हादसे के बाद सच्चाई दबा दी जाती है।
यही तो BJP मॉडल है – गरीबों की गिनती नहीं, तो ज़िम्मेदारी भी नहीं!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 11, 2025
या वृत्तवाहिनीने आपल्या तपासात ११ राज्यांतील ५० हून अधिक जिल्ह्यांमध्ये जाऊन १०० हून अधिक कुटुंबांची भेट घेतली. या प्रवासात असं समोर आलं की मौनी अमावस्येच्या रात्री, २८-२९ जानेवारी दरम्यान, अमृतस्नानासाठी जमलेल्या हजारोंच्या गर्दीतून झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ८२ लोकांचा बळी गेला आहे.
Crime News : पत्नीला २ सरकारी नोकऱ्या, स्वतः बनला प्राध्यापक; राजकीय नेत्याचा प्रताप
सरकारच्या वतीने मात्र केवळ ३७ मृत्यूंचीच नोंद करण्यात आली आहे. तसेच या घटनेत ६० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, अति गर्दीमुळे रात्री १:३० ते २:०० दरम्यान बॅरिकेड तुटले आणि त्यातून ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जातं आहे.दरम्यान या प्रकरणामुळे सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राहुल गांधींसह विरोधकांनी केंद्र आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. हा अहवाल आणि सरकारची आकडेवारी यातील तफावत आता देशभरात चर्चेचा विषय बनली आहे.