वीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण (फोटो- ट्विटर)
सागरा प्राण तळमळला गीताला 115 वर्षे पूर्ण
अंदमान-निकोबारमध्ये स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्याचे अनावरण
अमित शाह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
Aandman Nikobar: आज अंदमान निकोबार येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विंनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी पुतळ्याची निर्मिती करणाऱ्यांचा सत्कार केला.
Witness a historic day LIVE from Andaman as we present a grand tribute to the immortal legacy of Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar — featuring the Statue Inauguration followed by the "Sagara Praan Talamalala" Musical Cultural Program.https://t.co/KgvBTs2G1q — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 12, 2025
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी ‘सागरा प्राण तळमळला’ कार्यक्रमात पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकर यांच्यासोबत घालवलेल्या आठवणीना उजाळा दिला. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, ‘अंदमानला ही माझी तिसरी किंवा चौथी भेट आहे. एक दिवस मी शिवाजी पार्क येथून फिरत असताना मला तिथे एक माणूस फिरताना दिसला. तेव्हा मी 14 वर्षांचा होतो.”
“मला वाटले की तो मोठा माणूस आहे. माझ्या घरी माझ्या वडिलांचा आणि सावरकरांचा फोटो असलेले पुस्तक असल्याचे मला आठवले. त्यावरून मला आठवले की हे सावरकर आहेत. मी त्यांच्याकडे जाऊन माझी ओळख करून दिली आणि त्यांनी मला आता बोलावले”, असे हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.
RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
विश्वकल्याणाची पताका फडकविणारे श्रीराममंदिर उभे राहिले. आता पूर्वीपेक्षा अधिक भव्य, सामर्थ्यसंपन्न आणि सुंदर राष्ट्रमंदिर उभे करायचे आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित, आदित्य प्रतिष्ठान प्रस्तुत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्यात सरसंघचालक बोलत होते. यावेळी कांचीकामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी, आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर अभ्यंकर, अपर्णा अभ्यंकर उपस्थित होते.
“राममंदिर झाले, आता राष्ट्र…”; पुण्यातून RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
आपल्याच समाजाचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) उपकाराची अथवा अहंकाराची भावना नाही, असे मत कृतज्ञता पुरस्कार स्वीकारताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “संघाला संपूर्ण समाजाचे संघटन अभिप्रेत आहे. कारण समाज संघटित झाला तरच राष्ट्र वैभवसंपन्न होईल. राष्ट्र बलसंपन्न झाले तरच विश्वाला सुखशांती लाभेल. यातही देशाचे कल्याण संघच करेल, अशी आमची वल्गना नाही. तर समाज उभा राहिला तरच देश उभा राहील.” कठीण काळामध्ये समाजानेच संघाला साथ दिली, म्हणून संघ मोठा झाल्याचेही सरसंघचालक म्हणाले.






