Sakshi Maliks Withdrawal From The Wrestlers Movement Rejoin The Job Nrab
साक्षी मलिकची कुस्तीपटूंच्या आंदोलनातून माघार? नोकरीत पुन्हा रुजू
विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले होते. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन करत होते. मात्र, 28 मे रोजी पोलिसांनी जंतरमंतर येथून त्यांना हाकलून लावले होते. (Sakshi Malik's withdrawal from the wrestlers' protest)
विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले होते. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन करत होते. मात्र, 28 मे रोजी पोलिसांनी जंतरमंतर येथून त्यांना हाकलून लावले होते. (Sakshi Malik’s withdrawal from the wrestlers’ protest)
कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीपटूंच्या आंदोलनापासून स्वतःला दूर केले आहे. एवढेच नाही तर ती रेल्वेत नोकरीवर परतली आहे. साक्षीने या आंदोलनापासून दुरावण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
वास्तविक, विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात मोर्चेबांधणी केली होती. हे पैलवान २३ एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन करत होते. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. याआधी जानेवारीमध्येही कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात धरणे आंदोलन केले होते. मात्र, क्रीडा मंत्रालयाच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटू परतले.
दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले आहेत
7 महिला कुस्तीपटूंनी 21 एप्रिल रोजी ब्रिज भूषण विरोधात कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारींच्या आधारे 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक छळाचे दोन गुन्हे दाखल केले. पहिली एफआयआर अल्पवयीन मुलीने केलेल्या आरोपांवर आधारित आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरी एफआयआर इतर कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांशी संबंधित आहे. या प्रकरणांचा पोलिस तपास सुरू आहे.
कुस्तीपटूंनी अमित शहा यांची भेट घेतली होती
याआधी शनिवारीच कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. कुस्तीपटू साक्षी मलिकचे पती सत्यव्रत कादियन यांनी या भेटीची पुष्टी केली होती. या बैठकीला तेही उपस्थित होते. मात्र, बैठकीत कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांना अटक करण्याची मागणी उचलून धरल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र ही बैठक अनिर्णित राहिली. गृहमंत्र्यांकडून आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आम्ही बैठकीतून बाहेर पडलो, असे त्यांनी सांगितले. सत्यव्रत म्हणाले की, आम्ही आंदोलनासाठी पुढील रणनीती बनवत आहोत. आम्ही मागे हटणार नाही, आम्ही पुढील कारवाईचे नियोजन करत आहोत.
साक्षी मलिकच्या कारकिर्दीवर एक नजर
रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये साक्षी मलिकने ऑलिम्पिक पदक जिंकले होते. 2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये साक्षीने 58 किलो गटात रौप्य पदक जिंकले होते. त्यानंतर 2015 मध्ये दोहा येथे झालेल्या सीनियर एशियन रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये साक्षीने 60 किलोमध्ये कांस्यपदक जिंकले.
ऑलिम्पिक – रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये कांस्यपदक जिंकले (५८ किलो)
कॉमनवेल्थ गेम्स – बर्मिंगहॅम 2022 मध्ये सुवर्ण (62 किलो), ग्लासगो 2014 मध्ये रौप्य (58 किलो), गोल्ड कोस्ट 2018 मध्ये कांस्य (62 किलो).
आशियाई चॅम्पियनशिप – दोहा 2015 मध्ये कांस्य (60 किलो), नवी दिल्ली 2017 मध्ये रौप्य (60 किलो), बिशेक 2018 (62 किलो) मध्ये कांस्य, शियान 2019 (62 किलो) मध्ये कांस्य.
कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप – जोहान्सबर्ग 2013 मध्ये कांस्य (63 किलो), जोहान्सबर्ग 2016 मध्ये गोल्ड (62 किलो).
Web Title: Sakshi maliks withdrawal from the wrestlers movement rejoin the job nrab