अखिलेश यादव यांनी बॅरिकेटवरुन मारलेली उडी आणि माता प्रसाद पांडे युपी सभागृह गाजवल्याने समाजवादी पार्टी जोरदार चर्चेत आली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Akhilesh yadav News : नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यामध्ये कॉंग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये संसदेच्या मकर द्वारापासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढण्यात आला.यामध्ये राहुल गांधींसह सर्वात जास्त चर्चेत असलेले नेते म्हणजे समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव. अखिलेश यादव यांचा मोर्चामध्ये दिसून आलेला आक्रमक पवित्रा आणि त्यांनी बॅरिकेटवरुन मारलेली उडी हा चर्चेचा मुद्दा बनला आहे.
आजचा दिवस म्हणजे 11 ऑगस्ट हा समाजवादी पार्टीसाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील समाजवादी पार्टीची चर्चा होती तर दिल्लीमध्ये देखील अखिलेश यादव यांनी आंदोलन गाजवले. उत्तर प्रदेशमध्ये सध्या त्यांच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी समाजवादी पार्टीच्या आमदारांनी सभागृह अक्षरशः दणाणून सोडवले. अनेक मुद्द्यांवरुन आवाज उठवत समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशमध्ये जोरदार चर्चा मिळवली आहे. समाजवादीने अनेक मुद्द्यांवरुन आवाज उठवला. यामुळे उत्तर प्रदेश विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लखनौ मधील उत्तर प्रदेशच्या विधीमंडळामध्ये कामकाज सुरु होताच काही वेळातच, सपा नेते आणि विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडे यांनी त्यांच्यासोबत झालेल्या वाईट वर्तवणूकीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी दावा केला की ते काही दिवसांपूर्वी गोरखपूरला गेले होते जिथे त्यांना गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांचा मार्ग रोखण्यात आला. यानंतर सपा आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली. स्वतः माता प्रसाद पांडे यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया देत तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी वेगळाच निशाणा साधत असल्याचे म्हणत माता प्रसाद पांडे यांना सुनावले. या मुद्द्यांवरुन समाजावादी पार्टी ही उत्तर प्रदेश राज्यात राजकीय चर्चेच्या वर्तुळात कायम राहिली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तर दुसरीकडे समाजवार्दी पार्टीच्या प्रमुखांनी दिल्ली दणाणून सोडली. इंडिया आघाडीच्या निवडणूक आयोगाच्या विरोधातील आंदोलनामध्ये सपा नेते अखिलेश यादव सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांनी इंडिया आघाडीचा मोर्चा रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यावेळी अखिलेश यादव यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला. कन्नौजचे खासदार अखिलेश यादव यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवरून उडी मारली. अखिलेशने बॅरिकेडवरून उडी मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सपाचे नेते, खासदार आणि आमदार त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ जोरदार शेअर करत आहेत. त्यामुळे एकूणच, आजचा दिवस हा समाजवादी पार्टीसाठी राजकीय दृष्टीने अत्यंत चर्चेचा मानला जात आहे. उत्तर प्रदेशपासून दिल्लीपर्यंत समाजवादी पक्षाची चर्चा रंगली आहे.
VIDEO | Samajwadi Party MP Akhilesh Yadav (@yadavakhilesh ) was seen jumping over the police barricade, protesting with banners in hand as protesting opposition MPs were stopped by police barricades at Transport Bhawan while marching towards the Election Commission headquarters.… pic.twitter.com/OtvYEM3NgS
— Press Trust of India (@PTI_News) August 11, 2025