स्पॅनिश महिला पर्यटकावर सामूहिक बलात्कार; झारखंडमध्ये धक्कादायक प्रकार

झारखंडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. परदेशातून भारतात आलेल्या महिलेवर झारखंडमध्ये बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

    झारखंड – झारखंडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. परदेशातून भारतात आलेल्या महिलेवर झारखंडमध्ये बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका स्पॅनिश महिलेला मारहाण करुन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

    झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुरुमहाट याठिकाणी सदर गुन्हा घडला आहे. स्पॅन देशातून एक महिला व एक पुरुष भारतामध्ये पर्यटनासाठी आले होते. ते दोघे वेगवेगळ्या बाईकवरून जात होते. संध्याकाळची वेळ असल्याने दोघेही हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरमहाटजवळ विश्रांतीसाठी थांबले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा 10 वाजण्याच्या सुमारास 7 ते 8 या संख्येतील तरुण तेथे आले आणि त्यांनी प्रथम तिला मारहाण केली आणि नंतर महिलेवर बलात्कार केला. या घटनेत दोघेही जखमी झाले आहेत.

    सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री घटनास्थळ धाव घेत दोघांनाही सरैयाहाट सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, त्या ठिकाणी महिलेवर उपचार सुरू आहेत. सरैयाहाट रुग्णालयाबाहेर सुरक्षेसाठी पोलीस तैनात आहेत. रुग्णालयात कोणालाही प्रवेश दिला जात नसल्याची माहिती आहे. या घटनेत पोलिसांनी हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुंजी गावातील तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.