दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. (Earthquaken In Delhi )दिल्लीसह नोएडा आणि गाझियाबादमध्ये (Noida and Gaziabad) रविवारी पृथ्वी हादरली. दुसरीकडे हरियाणाच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत. यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसले.

    दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. (Earthquaken In Delhi )दिल्लीसह नोएडा आणि गाझियाबादमध्ये (Noida and Gaziabad) रविवारी पृथ्वी हादरली. दुसरीकडे हरियाणाच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत. यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता इतकी होती की लोक घराबाहेर पडले आणि रस्त्यावर आले. सुदैवाने या भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

    नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 3.1 इतकी होती. दुपारी ४.०८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणातील फरिदाबाद हे भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लोक आपापल्या घरात होते, मात्र पृथ्वी हादरताच लोकांनी बाहेर धाव घेतली.