केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी जाताय? तर थांबा…15 नोव्हेंबरनंतर चार धामचे दरवाजे होणार बंद; जाणून घ्या नेमकं का घेतलाय निर्णय?

विक्रमी संख्येने भाविक दर्शन आणि पूजेसाठी उत्तराखंडमधील चारधाममध्ये पोहोचले आहेत. येथे रोज नवनवीन विक्रम होत होते. पावसाळ्यात आणि त्यानंतरही येथे भाविकांची वर्दळ असते.

    नवी दिल्ली : विक्रमी संख्येने भाविक दर्शन आणि पूजेसाठी उत्तराखंडमधील चारधाममध्ये पोहोचले आहेत. येथे रोज नवनवीन विक्रम होत होते. पावसाळ्यात आणि त्यानंतरही येथे भाविकांची वर्दळ असते. आता थंडीचे आगमन झाले असून, लवकरच चार धामचे (Char Dham) दरवाजे बंद होणार आहेत. वाढती थंडी आणि बर्फवृष्टी पाहता गंगोत्री धाम आणि केदारनाथ धामचे (Kedarnath Temple) दरवाजे बंद करण्याची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत मुहूर्तावर 14 नोव्हेंबर रोजी रात्री 11.45 वाजता गंगोत्री धामचे दरवाजे बंद करण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय 15 नोव्हेंबरला भाऊबीजेच्या दिवशी यमुनोत्री आणि केदारनाथ धामचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत. मात्र, याची वेळ अद्याप ठरलेली नाही. त्याचबरोबर बद्रीनाथ धामचे दरवाजे 24 ऑक्टोबरला विजयादशमी सणावर निश्चित केला जाणार आहे. हिवाळ्यात चारही धामांमध्ये कडाक्याची थंडी असते. या दरम्यान 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता गंगा मातेचा मुकुट उतरवला जाईल. यानंतर आई गंगेची उत्सव डोली यात्रा हिवाळी स्थलांतर स्थळ मुखीमठ (मुखवा) येथे प्रस्थान करेल.

    15 नोव्हेंबरला भाऊबीजेच्या दिवशीयमुनोत्रीचे दरवाजे बंद होणार आहेत. त्याचवेळी बद्रीनाथ- केदारनाथ मंदिर समितीचे मीडिया प्रभारी डॉ. हरीश गौर यांनी सांगितले की, भैय्या दूजच्या दिवशी केदारनाथचे दरवाजेही बंद केले जातील. बाबा केदार यांची पंचमुखी चाल विग्रह उत्सव डोली यात्रा हिवाळी आसन ओंकारेश्वर मंदिर बंद करण्याची तारीख आणि शुभ उखीमठ येथे निघणार आहे.