Top Marathi News Today Live : बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार मैदानात
Marathi Breaking News Updates : सध्या सायबर फसवणुकीच्या घटना वाढताना दिसत आहे. या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी, CBI ने बुधवारी (दि.8) देशभरात मोठे छापे टाकले. दिल्ली, राजस्थान, गुजरातसह 7 राज्यात छापेमारीची कारवाई करण्यात आली.
डिजिटल अरेस्ट फसवणुकीशी संबंधित प्रकरणांमध्ये एजन्सीने एकाच वेळी दिल्ली-NCR, हरियाणा, राजस्थान, गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगालमधील सुमारे 40 ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई ऑपरेशन चक्र-5 अंतर्गत करण्यात आली. I4C (इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर) च्या NCRP पोर्टलवर नऊ जणांच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींद्वारे CBI ला हे प्रकरण प्राप्त झाले. तक्रारींच्या आधारे, CBI ने FIR नोंदवून तपास सुरू केला. या फसवणुकीत अनेक बनावट बँक खाती आणि टेलिकॉम नेटवर्क वापरण्यात आल्याचे तपासात उघड झाले, ज्याद्वारे आरोपी संबंधितांपर्यंत पोहोचले होते.
09 Oct 2025 06:45 PM (IST)
मुंबई : प्रत्येक सर्वसामान्य माणून त्याते स्वत:चे हक्काचे घर असावे, असे स्वप्न घेवून जगत असतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो खूप कष्ट घेतो. अशा सर्वसामान्यांचे हे स्वप्न म्हाडा पूर्ण करत आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५३५४ सदनिका व ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता संगणकीय सोडत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे. सदर सोडतीसाठी १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह १,५८,४२४ अर्ज प्राप्त झाले आहेत.
09 Oct 2025 06:31 PM (IST)
BJP-NDA News: बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याची घोषणा केली आहे. दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. बिहार विधानसभेचा निकाल 14 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. दरम्यान सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत एनडीएची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
09 Oct 2025 06:15 PM (IST)
Chief selector Ajit Agarkar’s tenure extended : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळली जात आहे. तसेच भारत आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळणार आहे. या मालिकेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या ऐवजी आता संघाची धुरा शुभमन गिलकडे देण्यात आली आहे. आशातच आता बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर सध्या चर्चेचा विषय ठरू लागले आहेत. याबाबत आपण जाऊन घेऊया.
09 Oct 2025 05:58 PM (IST)
परदेशी कंपन्या सामान गुंडाळून पाकिस्तानातून पळून जात आहेत. त्यांना वाटते की पाकिस्तानमधील अंतर्गत परिस्थिती त्यांच्या व्यावसायिक हिताची राहिलेली नाही. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक समुदायाला हे समजले आहे की राजकीय अस्थिरतेने त्रस्त असलेल्या या गरीब देशात त्यांचे उद्योग चालवण्यासाठी त्यांना कोणताही पाठिंबा किंवा प्रोत्साहन मिळणार नाही. तेथे व्यवसाय करण्याची सोय राहिलेली नाही.
09 Oct 2025 05:51 PM (IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी राजू शेट्टी यांनी सांगितले की, जयसिंगपूर येथे होणारी २४ वी ऊस परिषद ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पंढरी आहे. जशी वारकऱ्यांची वारी पंढरपूरला तशी ऊस शेतकऱ्यांची वारी जयसिंगपूरला चुकवू नये, असे आवाहन त्यांनी ऊस उत्पादक बांधवांना केले.
09 Oct 2025 05:40 PM (IST)
स्वीडिश अकादमीने गुरुवारी (९ ऑक्टोबर २०२५) साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला. या वर्षी, हंगेरीच्या लास्झलो क्रॅस्नाहोर्काई यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पुरस्काराने उत्कृष्ट पुस्तके किंवा कवितांद्वारे साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या लेखकांना मान्यता मिळाली आहे.
09 Oct 2025 05:38 PM (IST)
Eknath Shinde: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेना म्हणजेच महायुती आणि कॉँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच महाविकास आघाडी एकत्रित लढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान निवडणूक होण्याआधीच एकनाथ शिंदे यांना धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने त्यांची साथ सोडली आहे.
09 Oct 2025 05:22 PM (IST)
मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुसकान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका दमडीचीही घोषणा केली नाही. बिहार, गुजरात व पंजाब राज्याला केंद्राचे पॅकेज देणाऱ्या नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांवरील संकट पाहता केंद्र सरकारने राज्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
09 Oct 2025 05:06 PM (IST)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडीयम खेळला जाणार आहे. या कसोटीसाठी नवी दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत तयारी करत असून तो केवळ ही मलिका २-० विजयावर लक्ष केंद्रित नसून ऑस्ट्रेलियातील आगामी एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि त्याचा पूर्वसुरी रोहित शर्मा यांच्या भूमिकांवर देखील लक्ष केंद्रित करत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही अनुभवी खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात पुनरागमन करणार आहेत. या दोघांवर शुभमन गिलने भाष्य केले आहे.
09 Oct 2025 04:55 PM (IST)
महावितरण कंपनीमधील विद्युत विभागाच्या खाजगीकरण विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचाऱ्यांनी तीन दिवसाचा राज्यव्यापी संप पुकारलायं..याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार अधिकारी , कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन संपात सहभाग घेतलायं.. शासनानं महापारेषण मधील 200 कोटींच्या पेक्षा जास्त रक्कम असणारी प्रोजेक्ट आणि जनरेशन मधील चार हायड्रो प्रोजेक्टचं खाजगीकरण करण्याचा डाव घातलायं
09 Oct 2025 04:50 PM (IST)
धुळ्यातील शिरपूर नगर परिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीसाठीचा प्रभागनिहाय आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला असून यावेळी नगरपरिषदेत १६ प्रभागांतून ३२ नगरसेवकांची निवड होणार आहे. मागील निवडणुकीत १४ प्रभागांमधून २८ नगरसेवकांची निवड झाली होती. या वेळी दोन प्रभाग आणि चार नगरसेवकांची वाढ करण्यात आली आहे.
09 Oct 2025 04:45 PM (IST)
बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या करिता शिवसेना शिंदे गटाचे खा श्रीकांत शिंदे व कल्याण डोंबिवलीचे आमदार राजेश मोरे यांच्या माध्यमातून मदत कीर्ती वाटप करण्यात आले.. बीड तालुक्यातील कुर्ला गावात पूर्व बाधित शेतकऱ्यांना किराणा किट आणि कपड्याच्या वाटप करण्यात आले. मराठवाड्यात सहा हजार किटचे वाटप करण्यात आले असल्याचेही ठाण्याचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी सांगितले.. मदतीचे तोरण हेच शेतकऱ्याचे धोरण असे ब्रीदवादके घेऊन हे मदत करण्यात आली.
09 Oct 2025 04:40 PM (IST)
यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि त्यामुळे नद्यांना पूर आला खरिपाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले त्याचबरोबर नदीकाठच्या जमिनी देखील वाहून गेल्या गुरेढोरे वाहून गेली घरांमध्ये पाणी घुसले आणि ग्रामीण भागातील शेतकरी पुरता कोलमडून गेला.
09 Oct 2025 04:35 PM (IST)
महाराष्ट्रातील महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांच्या खाजगीकरण आणि पुनर्रचनेच्या (रिस्ट्रक्चरिंग) धोरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप आजपासून सुरू झाला आहे. तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपसरचिटणीस नितीन चव्हाण यांनी सांगितले की, तोडगा न निघाल्यास हा संप बेमुदत स्वरूपात सुरू ठेवण्यात येईल.
09 Oct 2025 04:30 PM (IST)
ग्रामरोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मागील चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले त्यांचे आमरण उपोषण कायम ठेवण्यात आले आहे. उपोषणकर्त्यांमध्ये श्री. श्रावणजी निळकंठराव बोकडे यांच्यासह सर्व ग्रामरोजगार सहाय्यक सहभागी आहेत.सहाय्यकांच्या सांगण्यानुसार, शासनाने दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार त्यांना अद्याप मानधन थेट वैयक्तिक खात्यावर देण्यात आलेले नाही. तसेच पूर्णवेळ कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, नियुक्ती व सेवा समाप्तीचे अधिकार जिल्हा प्रशासनाकडे देणे आणि दुर्गम भागांतील सहाय्यकांना विशेष दर्जा देणे या मागण्यांकडेही सरकारकडून कोणतीही सकारात्मक दखल घेण्यात आलेली नाही.
09 Oct 2025 04:25 PM (IST)
राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांनी खाजगीकरणाविरोधात आणि इतर धोरणात्मक मागण्यांसाठी ३ दिवसांचा संप पुकारला आहे. राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या वतीने सुरू केलेल्या या संपात सुमारे सात प्रमुख संघटनांनी सहभाग नोंदवला आहे. संपाच्या माध्यमातून कर्मचारी महावितरण कंपनीच्या उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालविणे, समांतर वीज वितरण परवाना देणे, TBCB प्रकल्पांमध्ये भांडवलदारांना देणे आणि कंपनीच्या IPO लिस्टिंगसह इतर प्रलंबित धोरणांविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. या संपात महेश चाबुकस्वार, धीरज गायकवाड, राजेंद्र घोरपडे, सुशील तायडे, गणेश कुंभारे आणि इतर अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
09 Oct 2025 04:20 PM (IST)
महाराष्ट्रातील महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांच्या खाजगीकरण आणि पुनर्रचनेच्या (रिस्ट्रक्चरिंग) धोरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप आजपासून सुरू झाला आहे. तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपसरचिटणीस नितीन चव्हाण यांनी सांगितले की, तोडगा न निघाल्यास हा संप बेमुदत स्वरूपात सुरू ठेवण्यात येईल.
09 Oct 2025 04:15 PM (IST)
राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांनी खाजगीकरणाविरोधात आणि इतर धोरणात्मक मागण्यांसाठी ३ दिवसांचा संप पुकारला आहे. राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या वतीने सुरू केलेल्या या संपात सुमारे सात प्रमुख संघटनांनी सहभाग नोंदवला आहे. संपाच्या माध्यमातून कर्मचारी महावितरण कंपनीच्या उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालविणे, समांतर वीज वितरण परवाना देणे, TBCB प्रकल्पांमध्ये भांडवलदारांना देणे आणि कंपनीच्या IPO लिस्टिंगसह इतर प्रलंबित धोरणांविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट करत आहेत.
09 Oct 2025 04:10 PM (IST)
मीरा-भाईंदर शहरात पहिलेच ‘ट्रॅफिक एज्युकेशन गार्डन’ सुरू झाले असून त्याचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले. गार्डनचे नाव स्वर्गीय नेते गिल्बर्ट मेंडोसा यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे.या गार्डनमध्ये शाळकरी मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना वाहतुकीचे नियम शिकता येतील. येथे रस्ते वाहतुकीशी संबंधित चिन्हे, स्पीड ब्रेकर, सिग्नल प्रणाली आणि प्रत्येक चिन्हाचा अर्थ व उपयोग याची सविस्तर माहिती दिली जाते. तसेच विशेष ‘Traffic Education Room’ तयार करण्यात आले आहे जिथे आरटीओ अधिकारी पालक, विद्यार्थी आणि लहान मुलांना नियमित मार्गदर्शन करतील. या उपक्रमामुळे वाहतुकीची जनजागृती वाढेल आणि अपघातांची संख्या कमी करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
09 Oct 2025 04:05 PM (IST)
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाज आज रस्त्यावर उतरला असून रायगडसह संपूर्ण कोकणातुन हजारोंच्या संख्येत कुणबी समज बांधवांनी आज पहाटे मुंबईकडे कुच केली. एसटी, खाजगी बस तसेच कारचा थांफा आज मुंबईत धडकणार असून कोणालाही कुणबीच प्रमाणपत्र देऊ नये, आमच्या ओबीसी च्या कोट्यातून कोणालाही आरक्षण दिले जाऊ नये अशा मागण्या ओबीसी समाज सरकारकडे करणार आहे.
09 Oct 2025 04:03 PM (IST)
उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये एका खाजगी विमानाला अपघात झाला आहे. हे विमान रन-वे वरून घसरल्याची घटना घडली आहे. हे विमान घसरल्यानंतर थेट झाडीमध्ये घुसले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची समोर आले आहे. खाजगी विमान जसे टेक ऑफ करण्यासाठी रन-वे वरून पुढे जात होते. त्याच वेळेस या विमानाचे चाक धावपट्टीवरून घसरले.
09 Oct 2025 03:55 PM (IST)
मुंबईत पत्रकारपरिषद घेत ठाकरे सेनेचे अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली. योगेश कदम यांच्या कथित गैरव्यवहारांची आणि गुन्हेगारांना मदत करण्याच्या प्रकरणांची तक्रार घेऊन थेट लोकायुक्तांकडे जाणार असल्याचं अनिल परब म्हणाले. तसेच, जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही, तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
09 Oct 2025 03:45 PM (IST)
‘बाळासाहेबांबद्दल फक्त संशय व्यक्त केला होता.बाळासाहेब आमचे दैवत आहेत. त्यांची बदनामी होईल असं काहीही करणार नाही’ असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
09 Oct 2025 03:35 PM (IST)
खासदार निलेश लंके वकील राकेश किशोरला संविधानाची प्रत देण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहेत.सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी 71 वर्षीय वकिला राकेश किशोर यांनी थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार केला होता. या घटनेचा देशभरातून निषेध केला जात आहे. त्याच वकीलाच्या घरी निलेश लंके संविधानाची प्रत घेऊन दाखल झाले आहेत.
09 Oct 2025 03:21 PM (IST)
वाहतूक कोंडीवरुन आज पुण्यातील चाकणमधील ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. ग्रामस्थ आणि एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर धडक मोर्चा काढला. खासदार अमोल कोल्हे देखील यावेळी रस्त्यावर उतरले. यावेळी पोलिस व कोल्हे यांच्यात बाचाबाची झाली.
09 Oct 2025 02:55 PM (IST)
उत्तर प्रदेशातील येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम विवाहातून केल्याने तरुणीच्या पाच भावांनी मिळून आपल्या बहीण आणि भाऊजीची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केलेल्या तरुणीचे नाव मुन्नी गुप्ता असे आहे तर तरुणाचे नाव दुखन साव असे आहे. हत्या केल्या नंतर मृतदेह जंगलात फेकून दिले. हि घटना उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात घडली आहे.
09 Oct 2025 02:50 PM (IST)
मेडिकल कौन्सिल कमिटी (एमसीसी) ११ ऑक्टोबर २०२५ रोजी नीट यूजी कौन्सिलिंग राउंड ३ साठी प्रोव्हिजनल सीट अलॉटमेंट निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवार आज ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत त्यांचे पर्याय भरू शकतात. याव्यतिरिक्त, उमेदवार आज दुपारी ४ ते रात्री ११:५५ वाजेपर्यंत त्यांचे पर्याय लॉक करू शकतात. उमेदवार अधिकृत वेबसाइट mcc.nic.in ला भेट देऊन त्यांचा नीट यूजी कौन्सिलिंग राउंड ३ सीट अलॉटमेंट निकाल तपासू शकतात. सीट अलॉटमेंट तपासण्यासाठी आणि अलॉटमेंट लेटर डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड आवश्यक असेल.
09 Oct 2025 02:45 PM (IST)
कर्जत/ संतोष पेरणे: तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवेसाठी महत्वाची असलेले कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय आरोग्यसाठी योगदान देत आले आहे.मात्र तेच ग्रामीण रुग्णालय हे अनेक समस्यांनी व्यापले आहे. काही महिन्यापासून तेथील नेत्र विभागात डॉक्टरच नाही अशी स्थिती झाली आहे.त्यामुळे नेत्र दोष असलेल्या रुग्णांना कोणतीही सुविधा मिळत नसल्याने रुग्णांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
09 Oct 2025 02:40 PM (IST)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ आता एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. देवींच्या शक्तींचा संग्राम, देवीच्या मनुष्य रुपातील भावनिक नात्यांची कसोटी आणि ‘मत्सर’ नावाच्या दुष्ट शक्तीचा प्रभाव हे सगळं मालिकेमध्ये दिसून येणार आहे. तुळजादेवीच्या मंदिरात घडणारा देवीचे बालरूप ‘जगदंबा’ आणि प्रत्यक्ष तुळजाभवानी यांच्यातील आमनासामना प्रेक्षकांना अक्षरशः थरारून टाकणार आहे. आई तुळजासमोर उभी राहिलेली जगदंबा ठामपणे म्हणते “तुळजाई, मत्सर कोण आहे, हे मी शोधून काढलंय!” उमा हीच मत्सर आहे!” देवी तुळजा स्तब्ध होते, तिच्या चेहऱ्यावरचा अविश्वास आणि धक्का स्पष्ट दिसतो. त्याचवेळी उमा शांत पण गूढ भावाने समोर येते. तिच्या स्थिर नजरेत आणि तिरकस स्वरात अघटीत गूढ दडलेलं आहे.
09 Oct 2025 02:30 PM (IST)
Bihar Elections 2025 : बिहार : बिहारामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करताच बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याचबरोबर सभा आणि आश्वासनांचा अक्षरशः पूर आला आहे. बिहारमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक वचने दिले जात आहेत. यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सरकारी नोकऱ्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
09 Oct 2025 02:25 PM (IST)
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील खरीप हंगामात केलेल्या भाताच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.सरत्या पावसाने केलेल्या भाताच्या शेतीचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने हेक्टरी 50 हजाराची मदत द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली. शिवसेना ठाकरे पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते शेतीच्या नुकसानाबद्दल भरपाई देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे दिसून आले.
09 Oct 2025 02:20 PM (IST)
Rinku Singh threatened with a ransom of Rs 5 crore: भारतीय क्रिकेटवर आता अंडरवर्ल्डचे सावट दिसून येत आहे. भारतीय संघाचा उदयोन्मुख स्टार रिंकू सिंगला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून (डी-कंपनी) धमक्या देण्यात आल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने हे प्रकरण उघड केले असून ज्यामुळे क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे.
09 Oct 2025 02:15 PM (IST)
हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातून हत्येची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केली नंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. पत्नीच्या चारित्र्यावर संशयावरून ही हत्या करण्यात आली आहे. डोक्यात घण मारून हत्या केल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माण तालुक्यातील हिंगणी गावाच्या हद्दीतील आसाळओढा परिसरातील घुटुकडे वस्तीवर बुधवारी घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
09 Oct 2025 02:10 PM (IST)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना एक डाव आणि १४० धावांनी जिंकला. या सामन्यात रवींद्र जडेजाने उत्कृष्ट कामगिरी करत त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळवून दिला. आता, टीम इंडिया दिल्ली कसोटी जिंकून वेस्ट इंडिजवर २-० अशी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.
09 Oct 2025 02:02 PM (IST)
दिवाळी सणाला अवघे काही तास शिल्ल्क राहिले आहेत. दिवाळीच्या आधी घरात साफसफाई करून फराळातील पदार्थ बनवले जातात. सणावाराच्या दिवसांमध्ये सगळीकडे खूप जास्त घाई असते. त्यामुळे कामाच्या धावपळीमध्ये चेहऱ्याकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होऊन त्वचा अतिशय चिकट आणि काळवंडल्यासारखी वाटू लागते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे फेशिअल आणि स्किन ट्रीटमेंट करून घेतात, ज्यामुळे त्वचा काही दिवसांपुरतीच सुंदर आणि चमकदार दिसते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.
09 Oct 2025 01:54 PM (IST)
म्यानमारमध्ये लष्कराने एका गावावर हल्ला केला आहे. म्यानमार लष्कराने आपल्याच नागरिकांवर हल्ला केला आहे. यामध्ये 24 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच 50 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास मध्यवर्ती भागांमध्ये सागाईंग प्रदेशातील एका गावावर लष्कराने हल्ला केला.
09 Oct 2025 01:54 PM (IST)
म्यानमारमध्ये लष्कराने एका गावावर हल्ला केला आहे. म्यानमार लष्कराने आपल्याच नागरिकांवर हल्ला केला आहे. यामध्ये 24 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच 50 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास मध्यवर्ती भागांमध्ये सागाईंग प्रदेशातील एका गावावर लष्कराने हल्ला केला.
09 Oct 2025 01:50 PM (IST)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अशोक मा.मा.’ सध्या प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करून बसली आहे. मालिकेने नुकताच ३०० भागांचा पल्ला गाठला आहे. आणि आता मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. स्पर्धेत दहा लाखाचं बक्षीस मिळवल्यानंतर भैरवीच्या घरी आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशोक, नीलिमा आणि मुलांनी तिच्यासाठी खास सरप्राईज पार्टी आयोजित केल्याचे नव्या भागात दिसत आहे. मालिका आता नव्या वळणार जाताना दिसणार आहे.
09 Oct 2025 01:40 PM (IST)
विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये (Pune news) दहशतवादपुरक हालचाली होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. शहरात काल रात्री पासून मोठ्या घडामोडी घडत आहे. शहरामधील कोंढव्यासह अनेक भागांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचे दिसून आले आहे. कोंढवा भागामध्ये ATS चे सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे दिसून आले आहे. पुणे पोलीस (Pune Police) आणि एटीएसचे हे संयुक्त ऑपरेशन सुरु असून यामुळे पुणे शहारामध्ये नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
09 Oct 2025 01:35 PM (IST)
अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा हेतू भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध मजबूत करणे आहे. चार वर्षापूर्वी अशरफ घनी यांचे सरकार पडल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानच्या संबंधासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी मुत्ताकी दारुल अलूम देवबंद मदरसा आणि ताजमहालला भेट देणार आहेत.
09 Oct 2025 01:25 PM (IST)
इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी ब्रुक यांनी त्याच्या लहानशा आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये धुमाकूळ घातला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये त्याने टीम इंडियाच्या गोलंदाजांना हैराण करून ठेवले होते. आता त्याच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. हॅरी ब्रुक याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी साखरपुडा उरकला आहे. ही माहिती त्यांनी त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या दीर्घकालीन गर्लफ्रेंड सोबत त्याने लग्न केले आहे.
09 Oct 2025 01:15 PM (IST)
बिहार विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी आणि दुसरा टप्पा ११ नोव्हेंबर रोजी आहे. त्यापूर्वी, छठ सणाचा दुसरा टप्पा २८ ऑक्टोबर रोजी संपतो. दुसऱ्या शब्दांत, पहिला टप्पा छठ संपल्यानंतर नवव्या दिवशी आणि दुसरा टप्पा १४ तारखेला आहे. सर्व पक्षाचे नेते दिवाळी आणि छठसाठी येणाऱ्या स्थलांतरितांना निवडणुकीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण छठ सण आणि निवडणुकांमध्ये लक्षणीय अंतर आहे. परिणामी, सर्व पक्ष स्थलांतरितांना रोखण्यासाठी काम करत आहेत.
09 Oct 2025 01:07 PM (IST)
राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. कुणबी प्रमाणपत्र देत सर्वच मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. याला ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध केला जात आहे. ओबीसी नेते असलेले आणि मंत्रिमंडळामध्ये असलेल्या छगन भुजबळ यांनी देखील या मागणीला विरोध केला आहे. यावरुन मत-मतांतरे सुरु असताना भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. छगन भुजबळ यांचा समर्थक असलेल्या व्यक्तीने आत्महत्या केली.
09 Oct 2025 01:00 PM (IST)
विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये दहशतवादपुरक हालचाली होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. शहरात काल रात्री पासून मोठ्या घडामोडी घडत आहे. शहरामधील कोंढव्यासह अनेक भागांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचे दिसून आले आहे. कोंढवा भागामध्ये ATS चे सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे दिसून आले आहे. पुणे पोलीस आणि एटीएसचे हे संयुक्त ऑपरेशन सुरु असून यामुळे पुणे शहारामध्ये नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
09 Oct 2025 12:45 PM (IST)
राजधानी दिल्ली येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती झोपेत असतांना त्याच्यावर उकळते तेल टाकल्याच्या समोर आले आहे. एवढेच नाही तर जखमांवर मिरची पूड टाकल्याचे देखील समोर आले आहे. या हल्ल्यात 28 वर्षीय दिनेश गंभीरीत्या जखमी झाला आहे. शेजारच्यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी पत्नीला अटक झालेली नाही आहे.
09 Oct 2025 12:30 PM (IST)
मुंबईच्या भिवंडी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. भिवंडी शहरातील प्रसिद्ध शाळेत फी नाही भरली म्हणून एका विद्यार्थ्याला जमिनीवर बसवण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे. ही घटना सलाहुद्दीन आयुबी मेमोरियल इंग्लिश अँड उर्दू स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे घडली आहे. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
09 Oct 2025 12:20 PM (IST)
डोंबिवली येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. हाय प्रोफाईल सोसायटीत दोन मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याचे समोर आले. केवळ बॉल अंदर आला म्हणून त्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने दोन लहान मुलांचे हात बांधून त्यांना मारहाण केल्याचे समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
09 Oct 2025 12:10 PM (IST)
ठाणे शहरातील ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठं देहविक्रीचं रॅकेट उघडकीस आले आहे. एक महिला सोशल मीडियाचा वापर करून देहविक्रीचे रॅकेट चालवत होती. तिला अटक केली असून तिच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाने केल्याचे समोर आले आहे.
09 Oct 2025 12:01 PM (IST)
मुंबईच्या आझाद मैदानावर आज कुणबी समाजाने ओबीसी एल्गार मोर्चाचे नियोजन केले आहे. यावेळी अनेक ओबीसी बांधव एकत्र येऊन ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहेत. मराठा समाजाला कुणबी नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या सरकारी धोरणाला या मोर्चातून तीव्र विरोध दर्शवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच शेकडो कुणबी कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर जय कुणबी लिहिलेल्या गांधी टोप्या आणि हातात निषेधाचे फलक पाहायला मिळत आहेत.
09 Oct 2025 11:50 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईतील राजभवनात ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांचे स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तोलांदोन करत भेट घेतली.






