आज सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प; यंदाच्या बजेटमध्येही रेल्वे धावणार सुसाट

गेल्या काही वर्षांपासून प्रवासी आणि माल वाहतूक रेल्वे गाड्यांची गती वाढली असून यंदाच्या केंद्रीय बजेटमध्येही रेल्वे सुसाट असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

    नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून प्रवासी आणि माल वाहतूक रेल्वे गाड्यांची गती वाढली असून यंदाच्या केंद्रीय बजेटमध्येही रेल्वे सुसाट असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. रेल्वेची अनेक कामे राज्यभरात सुरु असून नवे मार्ग आणि नागरिकांकडून होणाऱ्या मागण्यांबाबत काय निर्णय होईल, याबाबत अनिश्चितता असली तरीही रेल्वेच्या सध्या सुरु असलेल्या कामांसाठी आणि अमृत भारत स्थानक योजना, वंदे भारत रेल्वे आदी विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी शक्यता आहे.

    गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम बजेट सादर करतील. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने या अंतरिम बजेटमध्ये रेल्वेसाठी मोठी आर्थिक तरतूद होईल. 2024-25 मध्ये रेल्वेसाठी 3 लाख कोटींपेक्षा जास्त निधी मिळण्याची अपेक्षा आहे. हा निधी मागील अर्थसंकल्पापेक्षा 25 टक्क्यांनी जास्त असेल.

    रेल्वेसाठी 1.40 लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती, त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 2023-24 च्या अर्थसंकल्पात हाच आकडा 2.40 लाख कोटींवर गेला होता. आता यामध्येही आणखी वाढ होऊन यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी तसेच नवनवीन सुविधा अमलात आणण्यासाठी केंद्र सरकार 3 लाख कोटींपेक्षा जास्त रकमेची घोषणा करू शकते.

    लाईनचे काम जोरदास सुरु आहे. काही ठिकाणी ही कामे लवकरच पूर्णत्वास पोहोचतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सीएसएमटीवरील फलाट क्रमांक 10, 11, 12, 13 चा 24 डब्यांच्या गाड्यांसाठी विस्तार करण्यात आला आहे. हे काम पूर्णत्वास गेले आहे.