नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या कालावधीत, 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 57 मतदारसंघातील मतदार मतदानाचा हक्क (Voting Rights) बजावतील. ज्यामधून 904 उमेदवार रिंगणात आहेत.
पंजाबमधून 328 उमेदवार आणि उत्तर प्रदेशमधून 144 उमेदवार अनुक्रमे 13-13 जागांवर उभे आहेत. बिहारमधील 8 जागांवर 134 उमेदवार, ओडिशातील 6 जागांवर 66, झारखंडमधील 3 जागांवर 52, हिमाचल प्रदेशातील 4 जागांवर 37 आणि चंदीगडमधील एका जागेवर 19 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
येथे होणार मतदान
उत्तर प्रदेश : वाराणसी, महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया, बांसगाव, घोसी. गाझीपूर, बलिया, सलेमपूर, चंदौली, मिर्झापूर आणि रॉबर्टसगंज.
पंजाब : गुरुदासपूर, अमृतसर, खादूर साहिब, जालंधर, होशियारपूर, आनंदपूर साहिब, लुधियाना, फतेहगढ साहिब फरीदकोट फिरोजपूर, भटिंडा. संगरूर आणि पटियाला.
बिहार : आराह, बक्सर, करकट, जेहानाबाद, नालंदा, पटना साहिब, पाटलीपुत्र आणि सासाराम.
पटना साहिब : रविशंकर प्रसाद. बारामुल्ला ओमर अब्दुल्ला. आणि सज्जाद गनी लोन. जाधवपूर सायोनी घोष. खदूर साहिब अमृतपाल सिंग. मंडी : कंगना
पश्चिम बंगाल : बारासात, बशीरहाट, डायमंड हार्बर, दमदम, जयनगर, जाधवपूर, कोलकाता दक्षिण, कोलकाता उत्तर आणि मथुरापूर.