‘निष्कलंक ठरवलेल्या’ अजित पवार यांना गृहखाते न देण्याचं कारण काय?’; काँग्रेसच्या प्रवक्त्यांचा सवाल

नमो महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भाजपने निष्कलंक ठरवलेल्या’ अजित पवार यांना गृहखाते न देण्याचे जाहीर विधान केले. यावरुन काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना  टीका केली.

    पुणेः बारामतीमध्ये पार पडलेला नमो महारोजगार मेळावा अनेक बाबींसाठी चर्चेचा विषय ठरला. यामध्ये सुप्रिया सुळे व अजित पवार यांची न बोलणं, शरद पवार व विखे पाटील यांची भेटीची टाळाटाळ यांचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना गृहखातं देणारं नसल्याचं वक्तव्य चर्चेचा कारण ठरलं. यावरुन आता विरोधकांनी टीकास्त्र डागलं असून यामागचे कारण विचारले आहे. यावरुन काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना टीका केली.

    नमो महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भाजपने निष्कलंक ठरवलेल्या’ अजित पवार यांना गृहखाते न देण्याचे जाहीर विधान केले. मात्र त्यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद शेअर करून, शिंदे सेनेचा आक्षेप झुगारून अर्थखातेही दिले. असे असताना अजित पवारांच्या विश्वसनीयतेवर, कार्यक्षमतेवर, हेतुवर आक्षेप उपस्थित करायचे कारण काय ते जाहीर करावे असे काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे.

    मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत सत्ता व संख्याबळ असुनही, सत्ता चालवता येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना रेड कार्पेट टाकून उपमख्यमंत्री पद दिले. खुद् पंतप्रधानांनी त्यांच्यावर सिंचन धोटाळ्याचे जाहीर आरोप केले होते. भाजपला अखेर पंतप्रधानांचे आरोप हे खोटे व निराधार असल्याचा साक्षात्कार झाला. आणि पवार यांची कर्तबगारी, कार्यक्षमता लक्षात आली. त्यानंतर ८ दिवसांत त्यांना व सहकाऱ्यांना मंत्रीपदे देऊन, सत्तेत वाटा दिला. मात्र त्यांना गृहखाते न देण्यामागे काय गौडबंगाल आहे असा उपहासात्मक सवाल तिवारी यांनी केला.