हनिमूनसाठी गोव्याला जायचं सांगून नेलं अयोध्येला! पत्नीनं दिला पतीला घटस्फोट

नवऱ्याने बायकोला हनिमूनसाठी गोव्याला जायचे सांगून अयोध्याला नेल्याप्रकरणी बायकोने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

    भोपाळ: अयोध्या राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) निर्माण झाल्यानंतर लाखो भाविकांनी दोन दिवसांमध्ये दर्शन घेतले. राम मंदिर (Ram temple) दर्शनासाठी देशभरातील लोक आतुर झालेले असताना एकच विचित्र बातमी समोर येत आहे. नवऱ्याने बायकोला हनिमूनसाठी (Goa Honeymoon) गोव्याला (Goa) जायचे सांगून अयोध्याला नेल्याप्रकरणी बायकोने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. भोपाळमधील (Bhopal) हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

    मध्यप्रदेशमधील भोपाळ येथील एका दांपत्यांने हनिमूनला जाण्याचा प्लॅन केला. मात्र पतीने गोवाला जायचे सांगून अयोध्येला नेले. यामुळे बायकोने घटस्फोटासाठी फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केला आहे. याबाबत रिलेशनशिप काऊन्सिलर शाईल अवस्थी यांनी अधिकची माहिती दिली. ते म्हणाले, या जोडप्याचे गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात लग्न झालं आहे. यातील नवरा मुलगा हा आयटी इंजिनिअर आहे. लग्नानंतर नववधूने आपल्या पतीला परदेशात हनिमूनसाठी जाण्याच्या मागणी केली होती. पण तिच्या नवऱ्यानं आपण भारतातील एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊयात तशी माझ्या आई-वडिलांची इच्छा असल्याचे सांगितले. पण या वादात त्यांचं हनिमूनसाठी गोव्याला जायचं ठरलं.

    मात्र नवऱ्याने प्रत्यक्षात अयोध्येला नेले. गोवा ट्रिपच्या एक दिवस आधी नवऱ्यानं आपल्याला आपण अयोध्या आणि वाराणसीला चाललो आहोत कारण माझ्या आईची तशी इच्छा असल्याचं सांगितलं. अयोध्या-वाराणसीने जाऊन  आल्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला, यानंतर महिलेनं थेट पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून विश्वास मोडला असल्याचा आरोप केला आहे. मात्र या जोडप्याने विभक्त होऊ नये यासाठी समुपदेशन सुरु आहे.