देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढलं आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही वाढणारी रुग्णसंख्या आरोग्य मंत्रालयाची चिंत वाढवणारी ठरतेय. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 11 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर, 29 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये केरळ मधील रुगणांचा सर्वाधिक समावेश आहे.
[read_also content=”Twitter ने Blue Tick काढण्यास केली सुरुवात; शाहरुख, सलमान, विराट कोहली, राहुल गांधी बघा, कुणाकुणाच्या अकाऊंटवरून ब्लू टिक्स काढण्यात आल्या https://www.navarashtra.com/world/twitter-begins-removing-blue-tick-shah-rukh-salman-virat-kohli-rahul-gandhi-blue-ticks-were-removed-from-account-n-rps-388041.html”]
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या 24 तासात 11,692 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, या रुग्णसंख्येसह देशाताली सक्रिय प्रकरणांची संख्या 66,170 वर पोहोचली आहेत. तर, गेल्या 24 तासात झालेल्या 28 मृत्यूंसह देशभरातील आतापर्यंतची मृतांची संख्या 5,31,258 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये केरळने समेट केलेल्या नऊंचा समावेश आहे. तर, देशातील एकूण कोविड रुग्णांची आतापर्यंतची संख्या 4.48 कोटी झाली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी 0.15 टक्के आहेत आणि राष्ट्रीय कोविड-19 बरे होण्याचा दर 98.67 टक्के नोंदवला गेला आहे. 4,42,72,256 लोक आतापर्यंत कोरोनातुन बरे झाले आहेत. मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे.
कोरोनाचे रुग्णवाढीसाठी त्याचा नवीन प्रकार कारणीभुत असल्याचं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी सर्व खबरदारीच्या उपायांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असं आरोग्य मंत्रालायन सांगितले आहे.