Ravindra Jadeja World Record : भारतीय फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या नावावर अनेक विक्रम आहेत. एक उत्कृष्ट अष्टपैलू असण्यासोबतच तो एक वेगवान क्षेत्ररक्षकदेखील आहे. जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणारा तसेच दक्षिण आफ्रिकेचा सुपरमॅन म्हटला जाणारा जॉन्टी ऱ्होड्सही त्याच्या प्रतिभेची प्रशंसा करतो. मैदानावर कोणत्याही यशानंतर राजपुताना स्टाईलमध्ये तलवार फिरवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जडेजाने असा विक्रम केला आहे, ज्याची त्याला स्वतःलाही माहिती नसेल.
3187 खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाच्या नावावर मोठा विक्रम
Ravindra Jadeja World Record
३१८७ खेळाडूंमध्ये केवळ रवींद्र जडेजाच्या नावावर विश्वविक्रम
खरं तर, 1877 पासून 147 वर्षांत एकूण 2550 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत 3187 खेळाडूंनी वेगवेगळ्या संघांकडून कसोटी सामने खेळले, परंतु रवींद्र जडेजाने जे केले ते आजपर्यंत कोणालाही करता आले नाही.
रवींद्र जडेजाच्या नावावर आहे हा खास विश्वविक्रम
Ravindra Jadeja
रवींद्र जडेजाचा हा आहे खास विश्वविक्रम
होय, जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीत विजयी सामने खेळताना एकूण 2003 धावा केल्या, तर 216 विकेट घेतल्या. आजपर्यंत, आपल्या कारकिर्दीत कसोटी सामने जिंकून 2000 किंवा त्याहून अधिक धावा आणि 200 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा खेळाडू नाही.
अश्विन रवींद्र जडेजाच्या यादीत सामील होण्याची शक्यता…..
रविचंद्रन अश्विन हा या यादीत समाविष्ट होणारा पुढचा खेळाडू असू शकतो. अश्विनने कसोटी सामने जिंकताना 1942 धावा केल्या आहेत, तर 369 विकेट्स घेतल्या आहेत. जर त्याने आणखी 57 धावा केल्या तर त्याचा या यादीत समावेश होईल.
रविचंद्रन अश्विन कानपूरमध्ये चमत्कार
उल्लेखनीय आहे की, अश्विनने गेल्या सामन्यात शानदार शतक झळकावले होते, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक होते. त्याने सर्वाधिक शतकांच्या बाबतीत एमएस धोनीची बरोबरी केली होती. बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या कानपूर कसोटीत तो या यादीत सामील झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.