Shraddha Kapoor to Play Lavani dancer Vitabai Narayangaonkar in Biopic by chhava fame lakshman utekar
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर नवीन चित्रपटाच्या तयारीत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. त्यानंतर, बॉलिवूड दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर प्रेक्षकांसाठी प्रसिद्ध लावणी नृत्यांगनेचं खडतर आयुष्य पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की, ‘छावा’ चित्रपटाच्या यशानंतर, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर श्रद्धा कपूरसोबत त्यांचा पुढचा चित्रपट बनवणार आहेत आणि या चित्रपटात श्रद्धा एका मराठी मुलीची भूमिका साकारणार आहे. पण आता Tv9 भारतवर्ष डिजिटलला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट एका मराठी लोकनृत्याचा एक शक्तिशाली बायोपिक असणार आहे.
दिवंगत अभिनेते शरद तळवलकर यांच्या नातवाची हॉलिवूडमध्ये वर्णी, झळकला ‘या’ प्रसिद्ध वेबसीरिजमध्ये…
Tv9 भारतवर्ष डिजिटलला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूर चित्रपटामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नृत्यांगना आणि ‘लावणा सम्राज्ञी’ म्हणून प्रसिद्ध, लोकप्रिय असलेल्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अद्याप या वृत्तावर निर्मात्यांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण जर हे खरं ठरलं तर, श्रद्धाच्या कारकिर्दीतील ही सर्वात आव्हानात्मक भूमिका ठरू शकते. ‘तमाशा: विठाबाईचा आयुष्याचा’ ही प्रसिद्ध मराठी कादंबरी लोकप्रिय नृत्यांगना विठाबाईं यांच्या जीवनाची कहाणी सांगते.
विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर कोण होत्या ?
विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या फक्त एक लावणी नृत्यांगना नव्हत्या. त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक चढ– उतारांचा सामना करावा लागला आहे. गरिबी, समाजाच्या रूढीवादी विचारसरणीला आणि लावणी कलाकारांवरील लोकांच्या रागाला तोंड देत, विठाबाईंनी त्यांची कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. विठाबाई यांच्याबद्दलचा एक किस्सा प्रचंड प्रसिद्ध आहे. ९ महिन्यांच्या गरोदर असताना विठाबाईयांना लावणी करताना प्रसुती वेदना सुरु झाल्या होत्या. पण त्यांनी लावणी थांबवली नाही.
एवढंच नाहीच तर, त्यांना कळलं होतं की, त्या कोणत्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकतात. त्या तीव्र प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर विठाबाई मंचामागे गेल्या आणि बाळाला जन्म दिला. एवढंच नाही तर, गर्भ नाळ देखील विठाबाई यांनी दगडाने ठेचून काढली. बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रेक्षकांसमोर लावणी करण्यास सुरुवात केली. त्यांनी सादरीकरण थांबवलं नाही कारम पूर्ण मानधन घेतलं होतं.
परदेशात देशी लूकमध्ये चमकला परिणीती चोप्राचा पती, कपलच्या क्युट फोटोने वेधले लक्ष
दरम्यान, श्रद्धा कपूरचं मराठी कनेक्शन सर्वांनाच माहिती आहे. अभिनेत्रीचे आजोबा पंढरीनाथ कोल्हापुरे एक प्रसिद्ध गायक आणि कलाकार होते. त्यामुळे श्रद्धा अस्खलित मराठी बोलताना आपल्याला अनेकदा दिसते. श्रद्धा कपूरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, याआधीही श्रद्धाने ‘हसीना पारकर’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तिने या चित्रपटात दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरची भूमिका साकारली होती. तिने आपल्या भूमिकेला उत्तम पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.