T-20 World Cup and World Champions Victory Parade : टी-20 वर्ल्ड कप 2024 ट्रॉफीची विजयी परेड काल मुंबईत काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने क्रिकेट चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. भारतीय चाहत्यांनी आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी विक्रमी गर्दी करीत त्यांचे जंगी स्वागत केले. वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी टीम इंडियाचा 125 कोटी रुपये देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून देखील विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठा पेटारा उघडण्यात आलाय.
मुंबईत क्रिकेट चाहत्यांची तोबा गर्दी
विश्वचॅम्पियन्स, टी-20 वर्ल्ड कप 2024 ची विजयी परेड काल मुंबईत करण्यात आली. यावेळी मुंबईत क्रिकेट चाहत्यांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. विक्रमी हजेरी लावत क्रिकेट चाहत्यांनी आपल्या लाडक्या खेळाडूंचे जंगी स्वागत केले. त्यानंतर विश्वविजेत्या खेळाडूंची जंगी विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सांगता वानखेडे स्टेडिअमवर झाली. तर वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी टीम इंडियाचा 125 कोटी रुपये देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत.
महाराष्ट्र सरकारकडून विश्वचॅम्पियन्स खेळाडूंना बक्षीस
त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून देखील विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठा पेटारा उघडण्यात आला आहे. टीम इंडियातील खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. आज शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता विधानभवन येथे सेंट्रल हॉल येथे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.