दुबई – टी २० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 world cup final), ऑस्ट्रेलियाने (Australia vs. New Zealand) न्यूझीलंडवर ८ विकेट्सनी मात करत टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने शानदार बॅटिंग करत ७७ रन्स पटकावल्या. १४ वर्षांनंतर टी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचे ऑस्ट्रेलियाचे स्वप्न पूर्ण झाले असून, ते पहिल्यांदा टी-२० वर्ल्डकपचे विजेते ठरले आहेत.
न्यूझीलंडच्या १७३ रन्सच्या टर्गेटचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात झाली. तिसऱ्याच ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने एरोज फिंचला ५ रन्सवर माघारी पाठवले. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी वार्नर आणि मिचेल मार्शने ५९ रन्समध्ये ९२ रन्सची पार्टनरशीप केली. बोल्टने वार्नरला ५३ रन्सवर आऊट करुन ही पार्टनरशीप तोडली. त्यानंतर मॅक्सवेल आणि मार्शने ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा सावरला. त्यांनी ३२ बॉल्समध्ये ५० रन्सची पार्टनरशीप करत, १६ व्या ओव्हरपर्यंत ऑस्ट्रेलियासाठी विजय दृष्टीपथात आणला. दोघांनी नॉटआऊट राहत १९ व्या ओव्हरमध्येच टीमला विजय मिळवून दिला. मार्शने ७७ रन्स पटकावल्या आणि शेवटचा फोर मारत टीमला विजयी केले. मॅक्सवेलनेही त्याला चांगली साथ दिली.
या मॅचमध्ये टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या टीमने ४ विकेट्स गमात १७२ रन्स केले आणि १७३ रन्सचे टार्गेट ऑस्ट्रेलियासमोर ठेवले. पहिल्या विकेटसाठी डेरिल मिचेल आणि मार्टिन गुप्टिन यांनी २३ बॉल्समध्ये २८ रन्सची पार्टनरशीप केली. ही पार्टनरशीप जोश हेजलवूडने मिचलेला ११ रन्सवर आऊट करुन तोडली. पहिल्या विकेटनंतर न्यूझीलंडचा संघ सुस्तावलेला दिसला. त्यानंतर ३४ बॉल्सनंतर न्यूझीलंडच्या बॅट्समननी पहिला फोर मारला. एडम जम्पाने मार्टिन गुप्टिलला २८ रन्सवर आऊट केल्यानंतर मैदानात आलेल्या विलियम्सने गती पकडली, आणि ३१ रन्समध्ये हाफ सेंच्युरी पूर्ण केली. दहाव्या ओव्हरपर्यंत न्यूझीलंडचा स्कोअर १ विवेटवर ५७ होता. किवी कॅप्टन विलियम्सने १६ व्या ओव्हरनंतर शानदार खेळी केली आणि न्यूझीलंडच्या रन्स वाढविल्या. विलियम्सने ८५ रन्सची खेळी केली. न्यूझीलंडची तिसरी विकेटे हेजलवूडने ग्लेन फिलिप्सला १८ रन्सवर आऊट करुन मिळवली. त्यानंतर दोनच बॉलमध्ये विलियम्स ८५ रन्सवर आऊट झाला. त्यानंतर जिमी नीशम १३ तर टीम साइफर्ट ८ रन्सवर नॉटआऊट राहिले.