अलीकडे काही दिवसात देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (India Corona Update) देशाची चिंता वाढत असताना गेल्या 24 तासांत देशातील कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट पाहयला मिळाली. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या नव्या 6660 रुग्णांची नोंद करण्यात आली. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 65,683 वरून वर 63,380 वर आली आहेत. काल देशात 7,178 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती तर 16 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
[read_also content=”देशातील आजचा सोन्याचा दर काय? जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे! https://www.navarashtra.com/india/what-is-the-current-gold-price-in-the-country-how-much-you-have-to-pay-for-24-carats-gold-nrps-391259.html”]
गेल्या 24 तासात देशात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या 5,31,345 वर गेली आहे, ज्यामध्ये केरळमधील सर्वाधिक मृत्यूचा समावेश आहे. गेल्या 24 तासात केरळमधे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.तर, पंजाबमधील चार, दिल्लीत तीन, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी दोन आणि बिहार, हरियाणा, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे. देशातील एकूण मृतांचा आकडा 5,31,369 वर पोहोचला आहे.
#COVID19 | India reports 6,660 new cases and 9,213 recoveries in the last 24 hours; active caseload stands at 63,380. — ANI (@ANI) April 25, 2023
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील दैनिक पॅझिटिव्हिटी रेट 3.52 टक्के नोंदवण्यात आला आहे. तर, साप्ताहिक पॅझिटिव्हिटी रेट 5.42 टक्के नोंदवला गेला. दरम्यान, देशातील सक्रिय प्रकरणे 63,380 आहेत, जी एकूण संसर्गाच्या 0.14 टक्के आहेत, तर रुग्ण बरे होण्याचा दर 98.67 टक्के नोंदवला गेला आहे. आतापर्यंत 4,43, 11,078 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहेे. मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे.
मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.