IPL: IPL चा पहिला सामना २६ मार्चला होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयला स्पर्धेदरम्यान संघांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे जेणेकरून हॉटेल, प्रशिक्षण स्थळ आणि स्टेडियमपर्यंत पोहोचण्यात कोणतीही अडचण येऊ नये.
वृत्तानुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम संघांना सरावासाठी देण्यात आले आहेत. शनिवारच्या बैठकीनंतर बीसीसीआयने पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी सांगितले. या बैठकीला नार्वेकर आणि मंडळाच्या सदस्यांव्यतिरिक्त महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.
नार्वेकर यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “महाराष्ट्र सरकारने आयपीएलच्या यशस्वी आयोजनासाठी बीसीसीआयला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. प्रेक्षकांना परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.”