सौजन्य - royalnavghan In IND vs BAN 2nd Test Ravindra Jadeja Creates 300 Wickets Record and he Equals Kapil Dev R Ashwin record
IND vs BAN 2nd Test : बांगलादेशविरुद्धच्या ग्रीन पार्क कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी रवींद्र जडेजाने टीम इंडियासाठी इतिहास रचला. बांगलादेशची शेवटची विकेट रवींद्र जडेजाने घेतली. यासोबत रवींद्र जडेजा एका खास क्लबमध्ये जाऊन बसला आहे. रवींद्र जडेजा कसोटीत टीम इंडियासाठी 300 बळी आणि 3000 धावा करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. जडेजाच्या आधी कपिल देव आणि रविचंद्रन अश्विन यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आता जड्डूच्या नावावर हा पराक्रम झाल्याने दिग्गज अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जाऊन बसला.
रवींद्र जडेजाने रचला इतिहास
Congratulations @imjadeja for completing 300 wickets in Test match cricket. Your discipline and consistency with the ball have been pivotal in India's dominant run in the longest format of the game! 🇮🇳#INDvBAN pic.twitter.com/U8u9eeFuf0
— Jay Shah (@JayShah) September 30, 2024
दिग्गज कर्णधार कपिल देवच्या नावावर मोठा विक्रम
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये कपिल देव यांनी 5248 धावा केल्या आहेत आणि 434 बळीही घेतले आहेत. तर रविचंद्रन अश्विनच्या नावावर फलंदाजीत ३ हजार धावा आहेत. याशिवाय विकेट्सच्या बाबतीत त्याच्याकडे 500 हून अधिक बळींची नोंद आहे. या प्रकरणात अश्विन आता कसोटीतील महान भारतीय अष्टपैलू खेळाडू बनला आहे.
बांगलादेशचा डाव 233 धावांवर संपला.
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटीत रचला इतिहास
कानपूरच्या ग्रीन पार्क क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पावसामुळे सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांत केवळ 35 षटकांचाच खेळ होऊ शकला. चौथ्या दिवशी खेळ वेळेवर सुरू झाला आणि बांगलादेशने 3 गडी गमावून 107 धावांपर्यंत मजल मारली.
बांगलादेशची फलंदाजी
येथून अनुभवी फलंदाज मोमिनुल हकने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 13वे शतक झळकावले आणि आपल्या संघाची धावसंख्या 233 धावांपर्यंत नेण्यात यश मिळवले. मोमिनुल हक नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या. बुमराहने तीन विकेट घेतल्या. याशिवाय आकाशदीप सिंग, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाच्या खात्यात एक विकेट पडली. जडेजाने या सामन्यात केवळ 9.2 षटके टाकली ज्यात त्याने 28 धावा खर्च केल्या.