नवी दिल्ली: देशात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या 24 तासात देशात12,193 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 67,556 वर गेली आहे.
[read_also content=”मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीला अटक, 3 मॉडेल्सची सुटका https://www.navarashtra.com/crime/high-profile-sex-racket-exposed-in-mumbai-bhojpuri-actress-arrested-3-models-rescued-nrps-389984.html”]
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये शुक्रवारी 12,193 नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची वाढ झाली असुन या रुग्णवाढीमुळे देशातील कोविड प्रकरणांची संख्या 4,48,81,877 वर गेली आहे. तर, देशभरात 42 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यूस केरळ मध्ये झाले आहेत. मृतांमध्ये केरळमधील 10 जणांचा समावेश आहे. सध्या देशातील सक्रिय प्रकरणांची एकूण संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 0.15% आहेे, तर कोरोनातुन बरे होण्याचा दर 98.66% आहे.
तर, मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, आतापर्यंत देशभरातील लोकांना अँटी-कोविड लसींचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.