Santosh Deshmukh Case : '...हे तर गृहखात्याचं अपयश'; संजय राऊतांची टीका (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरुन जोरदार राजकारण रंगले. सत्ताधारींसह विरोधक देखील ही कबर काढून टाकण्याची मदत करत आहेत. एकीकडे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रव्यवहार केला आहे. तर दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीवरील बंदोबस्तामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून महायुतीवर निशाणा साधला आहे.
सामनाच्या अग्रलेखातून धडग्यातील औरंगजेब जीवंत केला अशा मथळ्याखाली टीका करण्यात आली आहे. यामध्ये लिहिले आहे की. पुढे लिहिले आहे की, औरंगजेब चारशे वर्षापासून धडग्यात विसावला आहे. त्या धडग्यावरुन महाराष्ट्रात दंगल पेटवण्यात आली. नागपूरची निवड त्या दंगलीसाठी केली. फडणवीस यांना अडचणींमध्ये आणण्यासाठी नागपूरची निवड कोणी केली का? नवहिंदुत्ववाद्याच्या राजकारणाला भाजपमधील वाटगे खतपाणी घालत आहेत. हा धोका महाराष्ट्राला आहे, असे सामनामध्ये लिहिण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हिंदू-मुसलमानांचा झगडा लावण्याची बाबराची क्षमता आता संपली, पाकिस्तानमुळेही दंगे पेटत नाहीत. त्यामुळे कबरीतला औरंगजेब बाहेर काढण्याची योजना आली. महाराष्ट्रातील एक आमदार अबू आइागी म्हणाले, “औरंगजेब क्रूर शासक नव्हता. त्याची लढाई ही धर्माची नव्हती तर सत्तेची होती. त्याने अनेक हिंदू मंदिरे बनवली.” आझमी यांच्या वक्त्तव्यावरून गोंधळ झाला. मुसलमानांना आजही बाबर, औरंगजेब वगैरे त्यांचे शासक वाटतात व त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या जातात. हे सध्याच्या नवहिंदुत्ववाद्यांच्या पथ्यावर पडते व ते चेकाळतात इस्लामी दरबारी मोहम्मद साकी मुस्तैद खानने मासीर-ए-आलमगिरी (१७३१) मध्ये लिहिले की, औरंगजेबाने फर्मान जारी करून काशी विश्वनाथाचे मंदिर तोडून तेथे मशिदीचे निर्माण केले. इतर धर्मीयांचे जबरदस्तीने धमर्मांतर करण्याचा आदेश दिला. मधुरेतील केशवराय मंदिर उद्ध्वस्त केले आणि जोधपुरातील अनेक मंदिरे तोडून त्यांचे अवशेष जामा मशिदीच्या जिन्यांखाली दफन केले. शिखांचे नववे गुरु तेगबहादुरजी आणि इतर शीस धर्मीयांची हत्या त्याने इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला म्हणून केली. छत्रपती संभाजीराजांची हत्या त्याने निघृण पद्धतीने केली. औरंगजेब हा सत्तापिपासू आणि धर्माध होताच होता. त्याने आपला बाप शहाजहानला कैद केले, तीन भाऊ दाराशिकोह, शाहशुजा आणि मुरादलाही ठार केले. असा औरंगजेब कोणल्याही धर्मात असला तरी तो कोणत्याही सभ्य समाजाचा आदर्श ठरू शकत नाही. मोगल शासक भारतात तलवार घेऊन आले ते येथील संपत्ती लुटण्यासाठी. त्यामागे धार्मिक प्रेरणा नक्कीच होती. १३९९ साली भारतावर हल्ला करण्यासाठी तैमूर लंगडा घुसला. त्याने हजारो निरपराधांची कत्तल केली. ‘तुजुक-ए-तैमुरी ‘मध्ये तैमूर सांगतो, “हिंदुस्थानात घुसण्याचा माझा हेतू साफ आहे. मी येथे पर्यटनासाठी आलो नाही. काफिरांना मारणे, दुसरे काफिरांची दौलत लुटणे. कारण ती मुसलमानांसाठी आईच्या दुधाइतकीच प्रिय आहे हे असे असताना देशातील एक प्रख्यात सिने कुटुंब आपल्या मुलाचे नाव ‘तैमूर’ ठेवते व आपले पंतप्रधान त्या तैमूरचे कौतुक करतात ते सर्व औरंगजेब कबर खात्याचे लोक सहन करतात, असा टोला सामनामधून लगावण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वाराणसी म्हणजे काशीत औरंगजेबाने मंदिरे लोडली. आता ‘अमृत काला’त वाराणसील कॉरिडोर बनविण्यासाठी शेकडो मंदिरे आणि पुरातन मूर्तीवर बुलडोझर फिरवले. त्या उद्ध्वस्त मूर्तीचे पुढे काय झाले? कोणीच सांगू शकले नाही. मोदी पांच्या काळात हे मूर्तिभंजन घडले औरंगजेब कूर होताच, पण नंतरचे ब्रिटिश शासनकर्तेही कुरच होते व त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना, भारतीय क्रांतिकारकांना निर्दयपणे मारले, जालियनवाला बागेत निःशख लोकांवर गोळीबार करणारा जनरल डायर हा ब्रिटिश शासक होता व साज आपले ब्रिटिशांशी उत्तम संबंध आहेत. मोगलांच्या खुणा आपण नष्ट करत आहोत, पण ब्रिटिशांच्या खुणा जतन करून ठेवल्या आहेत. औरंगजेबाने त्याचा बाप, भाऊ यांना तुरुंगात डांबले किंवा खतम केले. लालकृष्ण आडवाणी यांची स्थिती पाहिल्यावर अनेकांना ‘कैद’ झालेल्या शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही