भुवनेश्वर : सध्या देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत आहे. (74 years Independence Day) देशात स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. तरी सुद्धा अजून आपल्या देशात कुटूंब नियोजनावर कायदा (family planning law) करण्यात आलेला नाही, जगात चीननंतर (China) भारताचा लोकसंख्येत दुसरा नंबर लागतो. पण चीनमध्ये लोकसंख्या तसेच कुटूंब नियोजनावर काही बंधने लावण्यात आली आहेत, त्यामुळं तिथे लोकसंख्येवर आळा घातला जाऊ शकतो. पण भारतात वाढती लोकसंख्या (populations) ही देशाची खूप मोठी समस्या आहे. दरम्यान, वाढत्या लोकसंख्येवर व कुटूंब नियोजनावर आता ओडिशा सरकारने (Odisha Government) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
[read_also content=”शिंदे-फडणवीस सरकारवर फार काळ टिकणार नाही, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टिका https://www.navarashtra.com/maharashtra/shinde-fadnvis-government-wiil-be-not-long-time-prithviraj-chavan-315906.html”]
दरम्यान, ओडिशा राज्यातील नवविवाहित जोडप्यांसाठी एक अनोखी योजना सुरू करत आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार कुटुंब नियोजन कंडोम किट (Condoms kit) भेट म्हणून देणार आहे. त्यामुळं ओडिशा सरकारच्या या निर्णयामुळं लोकसंख्येवर नक्कीच आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या कीटमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचे एक पुस्तक दिले जाईल याशिवाय गिफ्ट किटमध्ये गर्भधारणा चाचणी किट, टॉवेल, कंगवा, नेल कटर, आरसा अशा काही जीवनावश्यक वस्तूंचा देखील समावेश असणार आहे. तसेच कुटुंब नियोजन तसेच कंडोम याबद्दल लोकांना शिक्षित करणे आणि त्यांचा अवलंब करण्यासाठी जागरूकता वाढवणे हा यामागील प्रमुख हेतू आहे.