छत्रपती संभाजीनगर – निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. नाराज इच्छुकांचे पक्षप्रवेश देखील वाढले आहेत. आता शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटातील आमदार आमच्या संपर्कामध्ये असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे गटाचे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सोडून सगळे आमदार आमच्या संपर्कात आहेत असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक करताना संजय शिरसाट म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी के[blurb content=””]लेल्या उठावानंतर त्यांनी अनेक संकटांना सामोरे जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समजस्यपणाने भूमिका घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या निर्णयापसून मागे हटत नाहीत असे देखील शिरसाट म्हणाले. बच्चू कडू यांच्या टीकेवर उत्तर देताना शिरसाट यांनी उठावात आमच्या सोबत होते त्यामुळे त्यांच्या विचारांना व शब्दांना महत्व दिले आहे असे उत्तर दिले.
त्याचबरोबर संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे आमदार संपर्कामध्ये असल्याचा दावा केला आहे. शिरसाट म्हणाले, “शिवबंधनला गंडा दोरा म्हणतात माझ्या तोंडून निघाले ते निघाले आम्ही त्याकाळी शिवबंधन बांधत होतो ते शिवबंधन होते. आज जे बांधत आहेत ते दोरा बंडल आहे. ठाकरे गटाचे सर्व आमदार आमच्या सोबत आहेत. फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी सोडून सर्व आमदार आमच्या सोबत आहेत,” असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे.