शाकिब अल हसनने मागितली देशवासियांची माफी; अखेरच्या सामन्यासाठी चाहत्यांना केले आवाहन
Shakib Al Hasan Retirement : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टेस्ट सामना कानपूरच्या ग्रीन पार्क येथे होणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या दुसरी कसोटीत दोन्ही संघ कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये आमने-सामने येणार आहेत, मात्र त्याआधी बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, बांगलादेशी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, शाकिब अल हसनने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, तो भारताविरुद्धच्या कानपूर कसोटीसाठी उपलब्ध असणार आहे, म्हणजेच तो कानपूर कसोटी खेळू शकतो, मात्र हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू यापुढे टेस्टमध्ये दिसणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मीरपूर कसोटीनंतर या फॉर्मेटला अलविदा करणार आहे.
SHAKIB AL HASAN ANNOUNCES TEST RETIREMENT.
– Shakib to retire from Test cricket after the Test match against South Africa in Mirpur. pic.twitter.com/g4DTAkxF9v
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 26, 2024
शाकिब अल हसनसाठी चेन्नई कसोटी निराशाजनक
या कसोटीत शकीब अल हसनला एकही विकेट घेता आली नाही. पहिल्या डावात त्याने 32 आणि दुसऱ्या डावात 25 धावा केल्या. यानंतर शाकिब अल हसनच्या फिटनेसवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तसेच, बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालने अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तमीम इक्बालचा असा विश्वास होता की दुखापतग्रस्त असूनही, भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी शाकिब अल हसनला प्लेइंग-11 चा भाग बनवण्यात आले.
बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघेने सुनावले खडे बोल
बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शकिब अल हसनबद्दल कोणतीही शंका नाही. सध्या मी माझ्या फिजिओशी किंवा कोणाशीही बोललो नाही, पण तरीही तो निवडीसाठी उपलब्ध आहे. मात्र, शाकिबला आपल्या खेळात सुधारणा करण्याची गरज आहे, असे त्यांचे मत आहे. ते म्हणाले की हे फक्त शाकिबच्या कामगिरीबद्दल नाही, मी सर्वांच्या कामगिरीने निराश आहे, चेन्नईमध्ये आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. मला खात्री आहे की शाकिबला माहित आहे की त्याला आणखी चांगले करण्याची गरज आहे.