(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे 31 ऑगस्ट रोजी पहाटे कर्करोगामुळे निधन झाले. प्रियाने वयाच्या 38 व्या वर्षी मीरा रोड येथील राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. तिच्या अचानक झालेल्या निधनामुळे सहकलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. प्रिया गेल्या कित्येक वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. 31 ऑगस्टरोजी तिची ही झुंज अपयशी ठरली. अनेकांनी सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहिली. प्रियाच्या निधनानंतर तिचा नवरा शंतनू मोघे याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शंतनूने तिच्या कठीण काळात तिची साथ दिली होती.
प्रियासाठी शंतनूने काम सोडलं होतं आणि अगदी काही दिवसांपूर्वीच त्याने एक मालिका हातात घेतली होती. प्रिया जायच्या आदल्या रात्री शंतनूचा पहिला एपिसोड रिलीज झाला होता.त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रियाने शंतनू आणि तिच्या आईसमोर प्राण सोडले.अशी माहिती तिचा भाऊ आणि अभिनेता सुबोध भावे याना एका मुलाखतीत दिली होती.
श्रद्धा कपूरचा व्हिडिओ व्हायरल, बॉयफ्रेंडला टॅग करत म्हणाली, ‘हे नखरे…’
जे काम त्याने थांबवलं होतं ते त्याने पुन्हा सुरू केलं आहे. प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिनेता शंतनू मोघेनं त्याचा स्टार प्रवाहवरील ;येड लागलं प्रेमाचं’या मालिकेतील प्रवास पुन्हा सुरू केला आहे. प्रियाच्या निधनाची गोष्ट ही त्याच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. मात्र त्याने आता स्वत:ला सावरलं असून तो पुन्हा कामाला लागला आहे. शंतनूने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.
अभिजीत खांडकेकर यानं एका मुलाखतीत बोलताना शंतनूबद्दल सांगितलं की. तो म्हणाला होता, त्याने पुन्हा एकदा कामाला सुरूवात केली आहे. तो लवकरात लवकर यातून बाहेर यावा अशी आमची इच्छा आहे.
Navratri: अभिजीत सावंतच पहिलं वहिलं गुजराती गाणं! नवरात्रीसाठी प्रेक्षकांना खास गिफ्ट
‘येड लागलं प्रेमाचं’ या लोकप्रिय मराठी मालिकेत आता शंतनु मोघेची एन्ट्री झाली आहे, आणि त्यांनी मंजिरीच्या भावाची भूमिका साकारली आहे.मालिकेत मंजिरीने रायाशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर, शंतनु म्हणजे मंजिरीचा भाऊ या निर्णयाला विरोध करतो. त्यांच्या या विरोधामुळे मालिकेत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.