(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या नात्याची चर्चा अनेक रंगत आहे. श्रद्धा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचा एक मजेदरा क्षण शेअर करताना दिसत आहे. श्रद्धा ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती एका टेबलजवळ बसलेली आहे.व्हिडिओ झूम इन -आउट करत आहे.ती पहिल्यांदा हसते, नंतर ती टक लावून बघते. नंतर ती रागाने काही तरी बडबड करत ग्लास उचलते. हा व्हिडिओ शेअर करताना श्रद्धाने लिहिले आहे,“असे नखरे सहन करू शकेल अशा व्यक्तीला शोधा.” या पोस्टमध्ये तीने राहुल मोदीला टॅग केले आहे. या सगळ्या मजेदार क्षणांना श्रद्धा कपूरने कॅप्शन दिलं आहे.या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “कोणाकडे असा ‘हट’ ऐकणारा आहे?” असा प्रश्न देखील तिने उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ तिचा बॉयफ्रेंड राहुल मोदीने शूट केला आहे.
लग्नाआधीच दिली गुडन्यूज? मराठी अभिनेत्याच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण…
श्रद्धाच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी तिच्या व्हिडिओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत.का चाहत्याने लिहिले, “नखरे नाहीतर क्यूटनेस बोलतात याला.” दुसऱ्याने म्हटले, “खूपच छान व्हिडीओ, खूप मजेदार.” दुसऱ्याने कमेंटमध्ये म्हटले आहे, “क्यूट दिसत आहेस.”अश्या अनेक कमेंट्सचा चाहत्यांनी वर्षाव केला आहे.
श्रद्धा कपूर सोशल मीडियावर कमालीची लोकप्रिय आहे. तिचे तब्बल ९३.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. तसंच इन्स्टाग्रामवर तिच्या पोस्ट आणि कॅप्शन्स इंटरेस्टिंग असतात. त्यातून तिचा साधेपणा आणि मराठमोळं वागणं दिसून येतं. इतकंच नाही तर ती चाहत्यांच्या कमेंट्सवर रिप्लायही करत असते.
Navratri: अभिजीत सावंतच पहिलं वहिलं गुजराती गाणं! नवरात्रीसाठी प्रेक्षकांना खास गिफ्ट
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या अफेअरच्या चर्चा 2024 मध्ये सुरू झाल्या , आणि त्याला कारण ठरलं ते मुंबईतील एक डिनर डेट. त्यानंतर, ते अनेक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. एक एअर होस्टेसने एक फ्लाइटमध्ये श्रद्धा आणि राहुल मोदी यांना एकत्र पाहिलं आणि तीने गुप्तपणे त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि चर्चा सुरू झाल्या. श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टीत आणि चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्येदेखील एकत्र दिसले होते.