मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला पराभवाचा झटका बसल्यानंतर याचे खापर अपक्ष आमदारांवर फोडण्यात येत आहे. तथापि हा पराभव शिवसेनेला बोचला असून निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी व काँग्रेसने मतांचा कोटा वाढवून भूमिका बदलल्याने शिवसेना नाराज झाली आहे. त्यामुळे येत्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना या दोन्ही घटक पक्षांवर विश्वास ठेवण्यास तयार नसून ‘आपापलं बघा’ असा सूचक संदेश दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले(Shiv Sena’s distrust of NCP, Congress Signs of failure in the lead).
राष्ट्रवादी समर्थक अपक्ष आमदारांनी भाजपाला मतदान करून शिवसेनेच्या उमेदवाराला पाडले, असा शिवसेनेचा आरोपही आहे त्यामुळेच शिवसेनेने आता विधान परिषद निवडणुकीत सावध भूमिका घेतली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या या सूत्रानुसार निवडणूक झाल्यास त्याचा परिणाम काँग्रेस पक्षाचा दुसरा उमेदवार निवडून येण्यास अडचण उद्भवण्याची शक्यता असल्याने काँग्रेसचीही डोकेदुखी वाढली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय राऊत यांचा विजय काठावर झाला तर संजय पवार यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. त्यामुळेच येत्या 20 जून रोजी होणाऱ्या परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीत बिघाडीचे संकेत आहेत.
10 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 7, भाजपाचे 5 आणि भाजप समर्थित अपक्ष 1 असे एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत. यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन उमेदवारांचा समावेश असून विजयासाठी 27 मतांचा कोटा आवश्यक आहे. काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी 10 मतांची गरज आहे. काँग्रेसकडे असलेल्या 44 आमदाऱ्यांच्या ताकदीवर त्यांचा 1 उमेदवार सहज निवडून येईल. 44 मतातून पहिल्या पसंतीची 27 मते पहिल्या उमेदवाराला गेल्यानंतर पक्षाची 17 मते शिल्लक राहतात.
10 वी जागा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपाची पुन्हा सर्व भिस्त पुन्हा एकदा अपक्षांवर आहे. या निवडणुकीत होणारे मतदान पूर्णपणे गोपनीय असल्याने महाविकास आघाडी आणि भाजपा पुन्हा एकदा एकमेकांची मते फोडण्याची रणनीती आखत असल्याचे समजते. राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे तिन्ही उमेदवार निवडून आल्याने भाजपाचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक बोलावली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या बैठकीत नेमके काय चुकले याची चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले.
[read_also content=”या असल्या बाईला आई म्हणायच? पोटच्या मुलाला विकून खरेदी केला टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशीन; पोलिसांनी अटक केल्यावर म्हणाली… https://www.navarashtra.com/crime/the-mother-sold-her-child-and-bought-a-tv-freezer-cooler-nrvk-290262.html”]
[read_also content=”जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडलं; बर्म्युडा ट्रँगलमध्ये विमाने, जहाजे का गायब का होतात याचा खुलासा अखेर झाला https://www.navarashtra.com/viral/bermuda-triangle-mystery-solved-nrvk-278192.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]