धाराशिवमध्ये राज्य परिवहन महामंडळाची परंडा बस आगाराची बस पलटी झाली आहे. या अपघातामध्ये 26 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये राज्य परिवहन महामंडळाची परंडा बस आगाराची बस पलटी झाली. या बसमधल्या २६ अपघातग्रस्तांना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी परांडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना बार्शी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
परंडा एसटी डेपोची ही बस परंडामधून धाराशिवला येत होती. बस सोनगिरी चाकूला परिसरात आली असता कंटेनरच्या मागून एक वाहन पुढे आले. वाहन अचानक समोर आल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही बस पलटी झाली. या अपघातामध्ये एकूण 26 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने परंडा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर चालकाला बार्शी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
Web Title: State transport corporation bus overturns at paranda depot 26 passengers injured nrab