T-20 world cup trophy Victory Parade : भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईकर चाहत्यांनी विक्रमी गर्दी करीत अनेक रेकॉर्ड मोडले. चाहत्यांचा उत्साह पाहून टीम इंडियाचे खेळाडूसुद्धा भारावून गेले. भारतीय खेळाडूंनासुद्धा एवढी गर्दी पाहून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. हे जिवंत सळसळते चैतन्य पाहून कोणाला धडकी भरणार नाही. अगदी वानखेडे स्टेडियमवर तर खचाखच भरलेले आहेच, पण त्याबरोबर मरीन ड्राईव्हवरील गर्दीने आज उच्चांक गाठला.
विराटने उंचावला चषक
#WATCH | Rohit Sharma and Virat Kohli lift the #T20WorldCup2024 trophy and show it to the fans who have gathered to see them hold their victory parade, in Mumbai. pic.twitter.com/jJsgeYhBnw
— ANI (@ANI) July 4, 2024
विश्वचॅम्पियन टीम इंडिया बार्बाडोसमध्ये वादळामुळे अडकून पडली होती. परंतु, विशेष विमानाने ही मंडळी मायदेशी आज दाखल झाली. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर आज संध्याकाळी मुंबईत विजयी रॅली निघणार होती. कर्णधार रोहित शर्माने तसे सर्व क्रिकेटप्रेमींना या विजयी रॅलीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. त्याप्रमाणे चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
चाहत्यांनी केले जल्लोषात स्वागत
𝙎𝙀𝘼 𝙊𝙁 𝘽𝙇𝙐𝙀! 💙
From #TeamIndia to the fans, thank you for your unwavering support 🤗#T20WorldCup | #Champions pic.twitter.com/GaV49Kmg8s
— BCCI (@BCCI) July 4, 2024
वानखेडेवर चाहत्यांची तुडुंब गर्दी
मुंबई क्रिकेट असोसिएशनने गुरुवारी संध्याकाळी भारताच्या T20 विश्वचषक विजय परेडसाठी वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांना विनामूल्य प्रवेशाची परवानगी दिली होती. पंतप्रधान मोदींची भेटीनंतर टीम इंडियाचे मुंबईत आगमन झाले. बीसीसीआयने नरिमन पॉइंट ते वानखेडे या 1 किमीच्या विजय परेडची व्यवस्था केली आहे, त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर एक छोटा समारंभ आयोजित करण्यात आला.