रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेक युक्रेननियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच मोठ्याप्रमाणात वित्त हानी देखील झाली आहे. गेल्या चौदा दिवसांमध्ये सहाशेहून अधिक मिसाईल रशियाने युक्रेनवर डागल्या आहेत. तसेच रशियाकडू युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे युक्रेनकडून देखील रशियाला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान रशियाने युद्ध थांबवावे यासाठी अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्र आणि जपानने देखील रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. आता या सर्व घडामोडीदरम्यान एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे ती म्हणजे रशियाने युक्रेमध्ये पुन्हा एकदा युद्धविरामाची घोषणा केली आहे. यापूर्वी दे्खील रशियाने परदेशी नागरिकांना युक्रेनबाहेर पडण्यासाठी पाच तासांचा एक युद्द विराम घेतला होता.