India Women vs England Women Schedule : महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच T20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत-इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. जून 2025 पासून भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्यात मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 28 जून रोजी नॉटिंगहॅम येथे होणार आहे.
पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार
भारतीय महिला संघ जून 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या काळात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 28 जून रोजी नॉटिंगहॅम येथे होणार आहे. दुसरा सामना 1 जुलै रोजी ब्रिस्टल येथे होणार आहे. तिसरा सामना ४ जुलै रोजी लंडनमध्ये होणार आहे. मालिकेतील चौथा सामना 9 जुलै रोजी मँचेस्टर येथे होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 12 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे होणार आहे.
तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 16 जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे होणार आहे. दुसरा सामना 19 जुलै रोजी लंडनमध्ये होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 22 जुलै रोजी चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळवला जाईल.
महिला टी-20 विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून होणार सुरू
महिला टीम इंडिया सध्या टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या तयारीत आहे. महिला टी-20 विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती. मात्र बांगलादेशातील खराब वातावरणामुळे ते यजमानपद हिरावून घेण्यात आले आहे. आता ही स्पर्धा यूएईमध्ये होऊ शकते. यामध्ये भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. टीम इंडियाचा शेवटचा गट सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.