नवी दिल्ली : भारतीय चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. आयपीएल मेगा लिलावाचे वेळापत्रक जवळपास निश्चित झाले आहे. आयपीएल २०२२ मध्ये १० संघ सहभागी होत असल्याने यावेळी आयपीएलचा थरार द्विगुणित होणार आहे. प्रेक्षकांना इथे प्रचंड उत्साह आणि टेन्शन मिळणार आहे.
मार्चमध्ये सुरू होणार आयपीएल!
आयपीएल मेगा लिलाव खूप यशस्वी झाला. अनेक खेळाडूंना फ्रँचायझींनी मोठी रक्कम देऊन निवडून आणले. आता सर्वांचे लक्ष आयपीएल २०२२ वर लागले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, T20 लीगचे सामने २६ मार्चपासून सुरू होऊ शकतात आणि अंतिम सामना २९ मे रोजी खेळवला जाऊ शकतो. बहुतांश सामने मुंबईतील वानखेडे मैदानावर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुण्यातही सामने होऊ शकतात.
एकूण १० संघ IPL २०२२ चा भाग आहेत.
१. चेन्नई सुपर किंग्स
२. दिल्ली कॅपिटल्स
३. कोलकाता नाईट रायडर्स
४. मुंबई इंडियन्स
५. पंजाब किंग्स
६. राजस्थान रॉयल्स
७. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू
८. सनरायझर्स हैदराबाद
९. लखनऊ सुपर जायंट्स
१०. गुजरात टायटन्स