ठाणे : माघी गणोत्सवाला माहेरी आलेल्या विवाहितेला नटण्या मुरडण्याची भारी हौस असते. मात्र हीच हौस तिच्या एकीच्या अगंलट आली आहे. कल्याण पश्चीमेतील आटाळी मानी परिसरात राहणारी सारिका चव्हाण माघी गणेशोत्सवासाठी आली असता तिचं १३ तोळ्याचं मंगळसूत्र दोन अल्पवयीन चोरांनी घरात घुुसुन चोरी केल्याची घटना घडली आहे. या दरम्यान झालेल्या झटपटीत मायलेकी जखमी झाल्या आहे.
[read_also content=”काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात https://www.navarashtra.com/movies/shooting-of-kajols-salam-venki-begins-nrps-236555.html”]
कल्याण पश्चीमेतील आटाळी मानी परिसरात राहणाऱ्या वत्सला चिखले यांची मुलगी सारिका चव्हाण तिच्या दोन मुलांसोबत आईच्या घरी माघी गणेशोत्सवासाठी आली होती. या दरम्यान सारिका चव्हाण यांनी १३ तोळ्याचं मंगळसूत्र घातले होते. इतक्या मोठ्या दागिन्यावर या दोन अल्पवयीन चोराची नजर पडली आणि या दोघांची नियत फिरली. त्याच रात्री या दोघांनी चोरी करण्याचे ठरवले आणि त्यांच्या घरात घुसले. घरातील दागिने चोरून चोरटे घराबाहेर निघत असतानाच आई आणि मुलीची झोप उडाली. चोरट्यांचा प्रतिकार करताना चोरट्यांनी दोघांवर प्राणघातक हल्ला केला आणि पसार झाले . या हल्ल्यात दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या. जखमी झालेल्या आई व मुलीला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार आणि पीआय शरद जिने यांनी तपास सुरु केला. अवघ्या चोवीस तासाच्या आत खडकपाडा पोलिसांनी तपास करत सीसीटीव्ही व तांत्रिक तपास करत पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं तर त्याचा साथीदार मात्र पसार झालाय. पोलीसांकडून त्याच्या शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीकडून चोरीस गेलेलं १३ तोळ्याचं मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे. दरम्यान या दोन्ही अल्पवयीन आरोपी विरोधात याआधी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली . ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन मुलाचे रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
[read_also content=”काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात https://www.navarashtra.com/movies/shooting-of-kajols-salam-venki-begins-nrps-236555.html”]